शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्ताव सादर करण्यास अधिकाऱ्यांना मिळेना वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:13 IST

सहा महिने लोटूनही अनेक विभागांनी त्यांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविले नसल्याचे पुढे आले आहे.

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीसीचा यंदाचा जिल्हा विकास आराखड्यासाठी २०३ कोटी रूपये मंजूर आहेत. या नंतर दोनवेळेस डीपसीच्या बैठका पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. त्यात लोणीकरांनी सर्व विभागप्रमुखांना सक्त ताकिद देऊन तातडीने आपआपल्या विभागाचे विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता सहा महिने लोटूनही अनेक विभागांनी त्यांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविले नसल्याचे पुढे आले आहे.जालना जिल्हा हा पूर्वीच एक मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. निधी मिळूनही त्याचा विनियोग कसा झाला हे पंचायत राज समितीच्या दौºयावरून पुढे आले आहे. या समितीने जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाºया योजनांचे वाभाडे काढले आहे. आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडून अद्याप विकास कामांचे प्रस्ताव तयार करून त्यांना तांत्रिक तसेच सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली नसल्याचे वास्तव आहे. मध्यंतरी नियोजन विभागाने जिल्हा परिषदेला निधी वितरित करताना पूर्वी ज्या कामांसाठी निधी दिला होता, त्या कामांचे भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सांगितले होते. मात्र ते देखील सादर न करण्यात आल्याने नियोजन विभागाने जिल्हा परिषदेला देण्यासाठीचा निधी थांबविला होता.जिल्हा परिषदेप्रमाणेच अनेक विभागांनी त्यांचा प्रस्ताव त्यांना आर्थिक नियतने मंजूर असूही तो पाठविला नसल्याचे दिसून आले. त्यात क्रीडा विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण, आरोग्य विभागांचाही समावेश आहे. एकीकडे निधी नाही म्हणून सर्वत्र ओरड असते. परंतु जिल्ह्यात सध्या निधी असताना केवळ प्रशासनातील अधिकाºयांची मानसिकता नसल्याने तो खर्च होत नसल्याचे चित्र आहे. आता मार्च महिन्यात जिल्हा नियोजन आणि विकास समितीला निधी मंजूर केला आहे. असे असताना आता सहा महिन्यानंतरही कोण्या विभागाला कोणत्या कामासाठी निधी हवा आहे, याचे प्रस्ताव तयार नसल्याने याकडे आता जिल्हाधिकाºयांनीच लक्ष देऊन उदासीन यंत्रणेला जागे करण्याची गरज आहे. एकूण जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन प्रस्ताव देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर