शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोटीचे लक्ष्य निर्धारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 01:14 IST

शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात आजपासून वृक्षारोपणाचा ‘महायज्ञ’ सुरू होणार आहे. जिल्ह्यात तब्बल १ कोटी ५ लाख रोपांची लागवड होणार असून, यासाठी शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.वृक्षतोडीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्याला सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा ढासाळलेला समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज बनली आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलत वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. जालना जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रानुसार ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक आहे. परंतू हे प्रमाण केवळ १.२९ टक्के एवढेच आहे. हे क्षेत्र वाढविण्यासाठी कसोसीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. शासनाच्या वतीने जिल्ह्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाकडून जिल्ह्याला १ कोटी ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सध्य करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनिकरण, रेशीम विभाग, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पोलीस यंत्रणेसह सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमार्फत नियोजन करण्यात आले आहे.वृक्षलागवड आणि संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वनविभागाच्या जिल्ह्यात २२ रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये २८ लाख रोपे लागवडीसाठी तयार करण्यात आली आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीत कोठे टँकरद्वारे तर कोठे उपलब्ध स्त्रोतातून पाणी देऊन ही रोपे जगविण्यात आली आहेत. निम, चिंच, बांबूसह इतर विविध प्रजातीची रोपे तयार आहेत. उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारी ५ लाख रोपे वगळता इतर रोपांचे सर्वसामान्यांना वाटप केले जाणार आहे. संस्था, संघटना, शाळांसह इतरांकडून येणा-या मागणीनुसार वनविभागाकडून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. तर इतर विभागांकडूनही वृक्षारोपण मोहिमेची जोरदारतयारी करण्यात आलेली आहे.वनरक्षकांसह वनमजूर राहणार कार्यरतवनविभागाला जिल्ह्यातील वनक्षेत्रात ५ लाख रोपे लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर वनविभागाकडे २८ लाख रोपे तयार आहेत. दिलेल्या उद्दिष्टानुसार रोपांची लागवड करण्यासाठी १३ वनरक्षक, ४० वनमजुरांसह त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील मजुरांची मदत घेतली जाणार आहे.ग्रामपंचायतीला होणार ३ हजार रोपांचा पुरवठाजिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस ३ हजार २०० रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकच्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कन्या वनसमृद्धी योजनाही जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.इतर विभागही सक्रियवृक्षारोपण मोहिमेसाठी वनविभागाने २८ लाख रोपे तयार ठेवली आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने जवळपास ५० लाख, रेशीम विभागाने जवळपास २५ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तर इतर शासकीय विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांमध्येही लागवडीसाठी रोपे तयार ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागenvironmentवातावरणNatureनिसर्ग