शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकास मिशन योजनेचा बोजवारा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:46 IST

मानव विकास मिशनच्या बसेस नसल्याने अनेकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीज मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ कुंभार पिंपळगाव परिसरातील विद्यार्थ्यांवर ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : मानव विकास मिशनच्या बसेस नसल्याने अनेकांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीज मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ कुंभार पिंपळगाव परिसरातील विद्यार्थ्यांवर ओढावली आहे.घनसावंगी तालुक्यात मुलींच्या शिक्षणासाठी मानव विकास मिशनच्या बसेस बंद करण्यात आल्या, तर काही ठिकाणी बसेस जात नसल्याने मुलींच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे. एकंदर घनसावंगी तालुक्यात मानव विकास मिशनच्या बसेसची वानवा दिसून येत आहे. ज्या काही बस आहेत, त्या येत नसल्याने अवैध वाहतुकीचा वापर करून टपावरून प्रवास करावा लागत आहे.कुंभारपिंपळगाव परिसरातील पिंपरखेड बुद्रूक, राजा टाकळी, शिवणगाव, उक्कडगाव, भादली, गुंज, श्रीक्षेत्र जांब समर्थ, देवी दहेगाव, विरे गव्हाण, अरगडे गव्हाण, लिंबी, मूर्ती, ना वाडी, नाथनगर, या ठिकाणी मानव विकासच्या बसेस सुरूच नाहीत तर काही गावात बस येतात परंतु त्यात जागाच शिल्लक नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण कायम आहे.या ठिकाणी चालू आहे बसतालुक्यातील काहीच मार्गावर मानव विकास बसेस चालू आहेत त्यात घनसावंगी माहेर जवळा- घनसावंगी, रांजणी- घनसावंगी, घनसावंगी- शेवगा- घनसावंगी ,अंबड -घनसावंगी कुंभार- पिंपळगाव, घनसावंगी- शेवगळ- अंबड, अशा सात मानव विकास अंतर्गत बसेस चालू आहेत.बस बंद असलेले गावेराजा टाकळी, पिंपरखेड, गुंज, अंतरवाली टेंभी, मंगरूळ, पारडगाव, लिंबी, मूर्ती, धामणगाव, मासेगाव , भादली, देवी देहिगाव, जांब समर्थ , विरेगाव, आरगडे गव्हाण, पिंपरखेड बुद्रूक या ठिकाणी बसेस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ज्यामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे तर मानव विकास मिशनच्या जास्तीत जास्त बसेस सोडण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणroad transportरस्ते वाहतूक