शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गूळ बाजारावर दर कपातीची संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:56 IST

शेतक-यांच्या गूळाला देखील भाव मिळत नसल्याने गूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथील गूळ बाजारात लातूरसह अन्य जिल्ह्यातून गूळाची आवक बऱ्यापैकी असली तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० ते ४०० रूपयांनी दर कमी असल्याने शेतक-यांच्या गूळाला देखील भाव मिळत नसल्याने गूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. जालना बाजारपेठेचे वैशिष्ट्य येथे विक्रीसाठी आणलेल्या गूळाला रोखीने पैसे दिले जातात.जालना गूळ मार्केटमध्ये सध्या पाच ते सहा हजार गूळाच्या भेलीची आवक आहे. सरासरी दर हा २३०० ते ३ हजार रूपये प्रती क्ंिटल भाव मिळत आहे. हा बाजारात आलेल्या गूळाला गुजरात, औरंगाबाद, नाशिक भागात विक्रीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या गावरान गूळला २१५० ते २४०० दर मिळत असून, युनिटच्या गूळाला २१६० ते २२०० रूपये दर मिळत आहे. रंगतदार गूळ २२०० ते २३०० दर मिळत आहेत. जालना लाल केसरी, गूळ पिवळा, गूळ केसरी, आदींचे दर हे २७०० रूपये दर मिळतात. सध्या गूळाची आवक ही घनसावंगी तालुक्यातील युनिटमधून येत असून, त्यात जोगलादेवी, खडका, भेंडाळा, तर परभणी जिल्ह्यातून पाथरी, मानवत तसेच औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, नवगण आदी ठिकाणांहून गूळाची आवक आणि उत्पादन होत असल्याचे सांगण्यात आले.सण : संक्र ांतीच्या तोंडावर भाव पडलेलेचसंक्रांत आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तिळगुळाचे लाडू बनविण्याची परंपरा आहे. त्यामुळे गुळाची मोठी गरज भासत असली तरी, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत गुळाच्या दरात सरासरी २०० ते ३०० रूपयांनी घसरले आहे. आणखी दहा दिवसांनी गुळाच्या दरात अल्पशी वाढ अपेक्षित असल्याचे गूळ मार्केटचे सरचिटणीस गोविंद सराटे यांनी सांगितले.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी