लिलाबाई मंत्री
बदनापूर : येथील जेष्ठ नागरिक लिलाबाई रामगोपाल मंत्री (७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील व्यापारी दिलीपकुमार मंत्री यांच्या त्या आई होत.
विजय थोरात
जाफराबाद : येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे कर्मचारी विजय ज्ञानदेव थोरात (४९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर पैठण (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुंडूसिंग महाराज
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील प्रसिद्ध शिवभक्त गुंडूसिंग महाराज यांचे गुरुवारी निधन झाले. तालुक्यातील तपोवन गोंधन येथील जागृत महादेव मंदिरात ते मागील ६० वर्षांपासून महादेवाची भक्ती करीत होते. जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील पंचक्रोशीत महाराजांचा मोठा भक्त परिवार होता.