जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रूग्णाचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर शुक्रवारीच ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या १७ जणांनाही रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील १३ जणांचा समावेश आहे. तसेच गोकुळवाडी ४, घनसांवगी तालुक्यातील आंतरवाली १, राजाटाकळी १, अंबड शहर २, बदनापूर शहरातील येथील एकाला बाधा झाली आहे. तर मंत्ररवाडी १, अकोला १, राजूर १, देवरगाव १, बुलढाणा ४, बीड १ व अँटीजन तपासणीत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १३ हजार ३५ वर गेली असून, त्यातील ३४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रूग्णालयातील उपचारानंतर आजवर १२ हजार ४०४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.