शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक दलाची आठ तास दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शहरातील यशवंतनगर भागातील एका जुन्या विहिरीत सोमवारी सकाळी एकाने उडी मारून आत्महत्या केली. झुडपांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील यशवंतनगर भागातील एका जुन्या विहिरीत सोमवारी सकाळी एकाने उडी मारून आत्महत्या केली. झुडपांनी वेढलेल्या या विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन व पोलीस कर्मचा-यांना तब्बल आठ तास लागले. ज्ञानेश्वर जनार्दन राऊत (४५, रा. यशवंतनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की यशवंतनगर परिसरातील विरळ वस्तीत एक जुनी विहीर आहे. सकाळी आठच्या सुमारास या विहिरीत एका व्यक्तीने उडी घेतल्याचे माहिती नागरिकांनी दिली. माहिती मिळताच तालुका ठाण्याचे बीट जमादार चितळे कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले. बंद पडलेली ही विहिरी पूर्णपणे झाडाझुडपांनी झाकलेली असल्याने पोलिसांना पाण्यात काहीच दिसले नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या अग्निशमन दलास बोलावण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख जाधव यांनी अगोदर विहिरीतील झाडे-झुडपे तोडण्याच्या सूचना जवानांना दिल्या. विहिरीत पाणी असल्यामुळे दोन जवानांनी पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती काहीच लागले नाही. पाण्यात माती पडल्याने आतील काहीच दिसेनासे झाले. त्यामुळे सर्व पाणी उपसण्याचा निर्णय घेतला. यास तीन तास लागले. विहिरीत गणपती मूर्ती विसर्जित केलेल्या असल्याने शोधकार्यात आणखी अडचणी आल्या. पाणी उपसल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून मृतदेह दोरीच्या सहाय्याने वर काढला. आजूबाजूच्या नागरिकांनी हा शिवणकाम करणा-या ज्ञानेश्वर राऊत यांचा असल्याचे सांगितले. दरम्यान, मृत राऊत यांचे नातेवाइकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी लक्ष्मण अप्पासाहेब मुळे यांच्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक मुसळे तपास करीत आहेत.