मठ पिंपळगाव : येथील कचरु दशरथ रत्नपारखे (४०) याचा मृतदेह सोमवारी तिस-या दिवशीही पोलिसांना सापडला नाही.आठ महिन्यांपासून गायब असलेल्या कचरु रत्नपारखे यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी चार दिवसांपूर्वी गजानन सुदाम खेकडे व गणेश कारभारी जिगे (रा. मठपिंपळगाव) यांना अटक केली होती. चौकशीत त्यांनी कचरु रत्नपारखे यांचा खून करून मृतदेह गावातील गट क्रमांक २४ मधील एका विहिरीशेजारी पुरल्याचे सांगितले होते. मारेक-यांनी सांगितलेल्या ठिकाणी पोलीस यंत्रणा तीन दिवसांपासून जेसीबीच्या मदतीने खोदकाम करून मृतदेहाचा शोध घेत आहे. सोमवारी पोलिसांनी विहिरीशेजारी भला मोठा खड्डा खोदला. मात्र, रत्नपारखे यांचा मृतदेह सापडला नाही. सायंकाळी खोदकाम थांबविण्यात आले.
कचरु रत्नपारखेचा मृतदेह सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:35 IST