शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दानवे- खोतकरांच्या आधी दंडबैठका; आता आणा-भाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:46 IST

एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले. त्यांनी दोस्ती निभावण्याच्या आणा- भाकाही घेतल्या. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचीही उपस्थिती यावेळी लक्ष वेधून घेत होती.प्रारंभी शिवसैनिकांची बैठक खोतकरांच्या निवासस्थानी तीन तास चालली. त्याच वेळेस भाजपची बैठक नगरसेवक भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नंतर दानवे खोतकरांच्या घरी गेले. प्रारंभी खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांची बंदव्दार अर्धा तास चर्चा झाली. नंतर तिन्ही नेत्यांनी बाहेर शिवसैनिकांसमोर येऊन ‘आतील’ काही घडामोडींची माहिती दिली. झाले गेले विसरून जाऊन यापुढे तरी दोन्ही पक्षांनी एकोप्याने काम करावे, असा त्यांचा एकंदरीत सूर होता. या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे भाजप- आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया या निमित्ताने उंचावल्या होत्या.हे तर जावा- जावांचे रुसवे फुगवे !दानवे आणि खोतकर यांचा वाद म्हणजे घरातील जावा-जावांचे वाद होते. मोठी जाऊ आणि तिचा नवरा हा घरातील कर्ता पुरूष असतो. तसे दानवे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे वागणे होते. साहजिकच लहान जाऊ अर्थात शिवसेना यामुळे मेटाकुटीस आली होती. ते थांबविण्याची गरज अंबेकर यांनी व्यक्त केली. खोतकर यांनी देखील अशीच री ओढली. दानवे यांनी यापुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असे होणार नाही, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकर