शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ खत कंपन्यांची कसून चौकशी व्हावी- दमानिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काही खत उत्पादक कंपन्या सेंद्रिय खतनिर्मिती करताना बनवाट साहित्याचा वापर करून शेतकऱ्यांच्या माथी काहीही मारत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, नांदेड येथील खत कंपनीच्या मालसह अन्य खत उत्पादन करणाºया कारखान्यांची कसून चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाव्दारे केली.बुधवारी दमानिया या परतूर येथील न्यायालयीन कामासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. तसेच जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्याच आठवड्यात जालन्यातील दोन खत उत्पादन करणा-या कंपन्यांमध्ये बोगस साहित्याचा वापर करून सेंद्रिय खत असल्याचे भासवले जात होते.या संदर्भात कृषी विभागानेच कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांच्या प्रयोगशाळांचे तसेच त्यांनी उत्पादीत केलेल्या सर्व खतांचे सँपल घेऊन त्याची उच्चस्तरीय तपासणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.यावेळी त्यांनी राजलक्ष्मी, राधागोविंद, उज्वल, किसान शक्ती, उज्ज्वल बिलेट, सूरजवर्षा इंडट्री आदी कंपन्यांची यादी निवेदनासोबत दिली आहे. या सर्व कंपन्यांवर नांदेड येथील एक बडा उद्योजक संचालक म्हणून कार्य करतो. असेही त्यांनी सांगितले. एकूणच जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या ज्या जमिनी राजकीय वर्तुळातील जवळच्या व्यक्तींनी खरेदी केल्या आहेत. त्याची चौकशी व्हावी असेही दमानिया यांनी यावेळी सांगितले. त्या जमिनींचे व्यवहार रद्द करून त्या मूळ मालकांना देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. परतूर येथील बागेश्वरी कारखान्याच्या व्यवस्थापनावर दमानिया यांनी काही वर्षांपूर्वी गंभीर आरोप केले केले होते, त्या आरोपा बाबत दमानिया यांना बागेश्वरीच्या प्रशासनाने न्यायालयात ओढले आहे. या संदर्भातील खटल्याची सुनावणी गुरूवारी होती, त्यासाठी त्या परतूर येथे आल्या होत्या. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही १७ जुलैला होणार आहे. यावेळी कैलास फुलारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रanjali damaniaअंजली दमानियाfraudधोकेबाजी