शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीला ग्राहक मंचाचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:29 IST

वीज नियामक आयोगाने निर्णय देताना स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची ठरवत संबंधित कंपनीला दिलासा दिला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यातील नवजीवन हायब्रीड सीडस् कंपनीत वीज मीटरच्या मुद्यावरून वीज वितरणने चुकीची कारवाई केली होती. विरोधात नवनजीवन सीडस्चे संचालक रमेश पवार यांनी याची तक्रार थेट वीज नियामक आयोगाकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन वीज नियामक आयोगाने निर्णय देताना स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई चुकीची ठरवत संबंधित कंपनीला दिलासा दिला आहे.या माहिती अशी की, महावितरणच्या जालना विभगातर्फे बियाणे उत्पादन कंपनीला वीज नियामक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वीज बिल दिले नसल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी आयोगाकडे वीज कायद्यातील कलम १४२ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. आयोगाकडे वीज वितरण कडून वीज बिलात दुरूस्ती करण्यास उशीर झाला असल्याचे मान्य केले. त्याच बरोबर सुधारित बिल देण्याची तयारी दर्शविली. आयोगाने ९ डिसेंबर २०१६ रोजी मंजूर केलेल्या आदेशात ग्राहक मंचाच्या आदेशाचे पालन करण्यात यावे तसेच झालेले नुकसान संबंधित अधिकाºयाकडून वसूल करावे असे निर्देश दिले.जालना विभागाने आयोगाचा व मुख्य अभियंत्यांचा आदेश असताना देखील आम्ही केलेली वीज बिल दुरूस्ती योग्य असल्याचे सांगून वीज पुरवठा करण्यात आला. या विरोधात पवार यांनी आयोगाकडे तक्रार केली. आयोगाकडील सुनावणीच्या वेळेस महाविरणतर्फे वीजबिल थकबाकी व भरणा याचे चुकीचे आकडे सादर करून आयोगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. आयोगाने २६ आॅक्टोबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशात हे प्रकरण वीज ग्राहक मंचाकडे पाठवून जालना विभागाकडून देण्यात आलेल्या बिलाची सुधारित तपासणी करण्याचे आदेश दिले होते.औरंगाबाद येथील ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे हे प्रकरण दाखल झाल्यावर मंचाने आयोजित केलेल्या दोन सुनावणीस जालन्याकडून कोणताही अधिकारी हजर नव्हता. सुनावणीस हजर न राहिल्याने संबंधित जबाबदार अधिका-यास ५०० रूपयांचा दंड भरण्याचा आदेशही दिला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीत महावितरणकडून तीन वेळेस वेगवेगळे प्रस्ताव दाखल केले. या तिन्हींचा अभ्यास केल्यावर ग्राहकाची बाजू मांडतांना अ‍ॅड. हेमंत कापडिया यांनी हे प्रस्ताव चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. मे २०१३ ते मार्च २०१८ या कालावधीत औद्योगिक दराने येणारे बिल त्यांनी मंचासमोर दाखल केले होते. यावर ग्राहक मंचाने ११ डिसेंबरला दिलेल्या आदेशात महावितरणकडून ३० मार्च २०१८ रोजी वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करताना दाखवलेली एक लाख ६ हजार रूपये ही रक्कम चुकीची असून, ग्राहकाकडे केवळ दोन हजार ५७० रूपये थकबाकी असल्याचा निष्कर्ष काढून हा निकाल वीज नियामक आयोगास कळविला आहे. ही कारवाई चेतन वाडे यांनी केली होती.दरम्यानच्या काळात आदेशाचे पालन न केल्यामुळे वीजबिल वाणिज्य दराने आकारण्यात येत असल्यामुळे वीज बिलाची थकबाकी रक्कम तीन लाख ४९ हजार रूपये एवढी दाखवण्यात येत होती. आयोगाने दिलेल्या आदेशा नंतर महावितरणतर्फे वीज बिलातून दोन लाख ५८ हजार रूपये कमी करून ग्राहकास एक लाख ६ हजार ७१० रूपयांचे बिल देण्यात आले. महावितरणतर्फे करण्यात आलेली ही वीजबिल दुरूस्ती मान्य नसल्याचे ग्राहकाने वीज वितरणला कळविले.त्यानंतरही वितरणकडून त्यांचा वीजपुरवठा २०१८ मध्ये आधी तात्पुरता आणि नंतर ३० मार्च रोजी कायमस्वरूपी खंडित केला. तसेच मीटरही पूर्वसूचना न देता काढून नेले. या कारवाई विरूध्द ग्राहकाने वितरण कंपनीच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्य अभियंत्यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून बिलात दुरूस्ती करून व ग्राहकास योग्य बिल देण्याचे जालना येथील कार्यालयास आदेश दिले होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणCourtन्यायालय