शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

जालना जिल्ह्यात थंडीच्या लाटेत कोमेजली पिके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:28 IST

पाच दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरू, डाळिंबाच्या बागा अक्षरश: वाळल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरू, डाळिंबाच्या बागा अक्षरश: वाळल्या आहेत. तसेच ज्वारी, भोपळ््याच्या पिकासह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतक-यांना पुन्हा दुष्काळात तेरावा महिना आला आहे़तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील गजानन हरिभाऊ भुते, कृष्णा भुते, पांडुरंग काटोले, रवींद्र शिंंदे यांनी गेल्या पाच- सहा वर्षांमध्ये पेरूची फळबाग चांगली फुलविली होती. या फळबागेपासून त्यांची आर्थिक उन्नती सुद्धा झाली. यावर्षी त्यांनी शेततळ््यातील पाण्यावर फळबाग जोपासली. यामुळे पेरूचे उत्पादन चांगले भरभरून आले होते. परंतु, पेरूचा अर्धा हंगाम संपत आला असतानाच गेल्या चार- पाच दिवसांपासून तालुक्यात थंडीची लाट आली आहे. यामुळे नागरीक सकाळी लवकर घराबाहेर पडत नाहीत. मात्र, या थंडीमुळे फळबागा वाळतील असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, एकट्या अवघडराव सावंगी या गावातील गजानन भुते यांच्या दहा एकर पेरूच्या बागेतील ३ एकर मधील पेरूची झाडे वाळली आहेत. या झाडांना पेरू सुद्धा लगडलेले आहेत. शिवाय पांडुरंग काटोले व रवींद्र शिंदे यांचे दोन एकर मधील पेरूची बाग वाळली आहे.या शेतकºयांनी मोठ्या परिश्रमाने पेरू व सीताफळाची बाग पिकवून या भागातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले होते. त्यामुळे या गावातील शेतकºयांनी सीताफळ व पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावर शेतक-यांनी ठिबक सिंचनावर भोपळ्याचे सीड्स प्लॉट लावले होते. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. भोपळ््याला काही ठिकाणी फुले व भोपळे लागले. पण, थंडीमुळे भोपळ््याचे पीक पूर्णपणे वाळले आहे. यात बोरगाव खडक येथील फकिरबा पार्वे, राजेंद्र पार्वे, गंगाधर व्यवहारे, रमेश पार्वे यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या बोरगाव खडकमध्ये एका कंपनीच्या भोपळ््याच्या सीड्सचे २५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकºयांनी सांगितले आहे़पिंपळगाव सुतार, चांधई एक्को, राजूर, बाणेगाव, हसनाबाद या भागातील काही शेतक-यांनी शाळू ज्वारीची पेरणी केली होती. या ज्वारीला काही ठिकाणी कणसे लागली आहेत. मात्र, या थंडीमुळे ज्वारीचे पीक वाळले आहे.पिंपळगाव सुतार येथील शेतकरी राजू दानवे यांनी सांगितले की, दोन एकर क्षेत्रामध्ये ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, या थंडीमुळे पीक पूर्णपणे वाळले आहे. यामुळे आता केवळ ज्वारी पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होईल.भोपळ्याचे पीक झाले उद्ध्वस्ततालुक्यातील हसणाबाद परिसरातील बोरगाव खडक, खडकी, बोरगाव, सिंरजगाव वाघ्रूळ, निमगाव, नळणी, जवखेडा, रजाळा, टाकळी, विटा या पूर्णा व गिरजा या नदी काठावर पाणी उपलब्ध असलेल्या शेतकºयांनी एका कंपनीकडून भोपळा पीकाचे सिड्सचे प्लॉट घेतले आहेत. थंडीमुळे या पिकाची अशी अवस्था झाली.भाजीपाला गारठलातालुक्यात काही ठिकाणी ठिंबक सिंंचनावर पाच दहा गुंठ्यांमध्ये वांगी, टॉमेटो, गवार, मेथीची भाजी, कारले, दोडके, मिरची इ. भाजीपाला शेतकºयांनी लावला होता. मात्र, थंडीमुळे हा भाजीपालाही गारठला आहे. यामुळे येणा-या काळात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे़हरभ-याचे पीक बहरलेया थंडीमुळे बहुतांश पिकांचे नुकसान झाले असले तरी ज्या शेतकºयांनी हरभरा गहू पिकाची लागवड केली आहे, अशा पिकांना या थंडीचा लाभ झाला आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनagricultureशेतीFarmerशेतकरी