शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
2
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
3
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
5
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
6
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
7
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
8
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
9
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
10
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
11
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
12
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
14
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
15
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
16
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
17
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
18
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
19
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
20
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

जालना जिल्ह्यात फोफावले अवैध धंदे, मटका सुरू; पोलिसांचे दुर्लक्ष..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:21 IST

अवैध धंद्यांत सहभागी असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी मटका व इतर अवैध धंदे मात्र जिल्ह्याच्या विविध भागांत बिनदिक्कत सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैध धंद्यांत सहभागी असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी मटका व इतर अवैध धंदे मात्र जिल्ह्याच्या विविध भागांत बिनदिक्कत सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. यावर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे यानिमित्त आढळून आले आहे. पूर्वीच्या पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी पूर्णपणे बंद केलेले अवैध धंदे सध्या सर्रास सुरु असल्याचे दिसून येत आहे.अधिक पैशांचे आमिष दाखवून गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदाच शहरासह जिल्ह्यात जोमात सुरु आहे. जालना शहरातील बसस्थानक, भोकरदन नाका, लक्कडकोट, चंदनझिरा, एमआयडीसी, शनिमंदीर, नूतन वसाहत, गांधी चमन, रेल्वे स्थानक, मस्तगड, अलंकार टॉकिज परिसर, सिंधी बाजार, शोला चौक, गांधी नगर, मंगळ बाजार, आझाद मैदान परिसर, फूल बाजार, कन्हैयानगर, नवीन मोंढा यासह बदनापूर, शेलगाव, भोकरदन, राजूर, जाफराबाद, बाजार गेवराई, टेंभूर्णी, चिखली, केदारखेडा, रामनगर, विरेगाव, नेर, सेवली, वाटूरफाटा, मंठा, परतूर, आष्टी, सातोना, कुंभार पिंपळगाव, घनसावंगी, तीर्थपुरी, शहागड, गोंदी, अंबड, गोलापांगरी, हसनाबाद, पारध या प्रमुख गावांसह छोट्या छोट्या गावांमध्ये मटका सुरु असल्याचे आढळून येत आहे. विशेष म्हणजे मटका घेणा-या बुकींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी त्यांचे नेटवर्क अजूनही सुरुच असल्याचे दिसते. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असून, आजी माजी नगरसेवक व काही राजकारण्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी अवैध धंद्यांना लगाम लावून कारवाईचा फास आवळला होता. त्यामुळे अवैध धंदे करणा-यांनी त्यांचे बस्तान इतरत्र मांडले होते. मात्र, सध्या आॅनलाईन लॉटरी, क्रिकेट मॅचवरील बेटिंग व मटका इ. अवैध धंदे फोफावले असून, याविरुद्ध कडक मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.शहरात मटका चालविणा-या १५ जणांविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईमुळे या प्रकारांना आळा बसला आहे. आणखी ५० जणांवर कारवाई प्रस्तावित आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास या पुढे विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गोर यांनी सांगितले.शहरातील विविध भागांत करमणूक केंद्राच्या नावाखाली अवैध आॅनलाईनचा लॉटरी व्यवसाय सर्रास सुरु असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जात असल्याचे लोकमतने स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आणले. याची दखल पोलिसांनी घेतली. मात्र, ५० पैकी जवळपास २८ केंद्रांचा पंचनामा करण्यात आला. तो केवळ देखाव्यापुरताच असल्याचे दिसून आले. कुठलाही शासन परवाना नाही, शासन कराचा भरणा नसताना याला क्लीनचिट देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. गत दिवस शहरातील विविध आॅनलाईन लॉटरी सेंटर्स बंद होती. ती रविवारपासून सुरु झाल्याचे आढळून आले.