शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कडकडीत बंद; ठिकठिकाणी दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:24 IST

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. जमावाने खाजगी वाहनांना लक्ष्य करीत बसवर दगडफेक केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. जमावाने खाजगी वाहनांना लक्ष्य करीत बसवर दगडफेक केली. नूतन वसाहत भागात जमावाने एक खाजगीवाहन जाळले, तर अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या वाहनावर दगडफेक केली. दुपारनंतर बसच्या सर्व फे-या रद्द करण्यात आल्या होत्या. दगडफेकीत १५ बसेसचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळपर्यंत शहरातील बहुतांश दुकाने बंद राहिली तर रस्त्यावरही शुकशुकाट दिसून आला.भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने रास्ता रोको करण्यात आला. मात्र, दुपारी जमावाने बसेससह खाजगी वाहनांना लक्ष्य करीत दगडफेक केली. सकाळी अकराच्या सुमारास जालना-सिंदखेडराजा रस्त्यावरील नंदापूर फाट्यावर जमावाने रास्ता रोको करून दगडफेक केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती.रामनगर रस्त्यावरही जमावाने टायर पेटवून देत रास्ता रोको केला. मान देऊळगाव येथेही दोन बसेससह खाजगी वाहनांवर दगडफेक झाली. जालना-औरंगाबाद रस्त्यावरील चंदनझिरा परिसरात बसवर दगडफेकीची घटना घडली. शहरातील भोकरदन नाका परिसरात काही युवकांनी जालना- औरंगाबाद बसवर दगडफेक केली.कन्हैयानगर रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास तरुणांच्या एक गटाने रस्त्यावर उतरून वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. नूतन वसाहत भागात वाहनांवरील दगडफेकीत मोठे नुकसान झाले. युवकांनी एका खाजगी वाहनाला आग लावली. तर गांधी चमन चौक, टाऊन हॉल परिसरात जमावाने घोषणाबाजी करीत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. फळांच्या हातगाड्या उलथून टाकल्या. भाजीपाला विक्रेत्यांना हुसकावून लावले. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली.दरम्यान, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे फौजफाट्यासह रस्त्यावर उतरले. नूतन वसाहत भागात जमावाला आवरत असताना काहींनी अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या वाहनावर दगडफेक करून नुकसान केले. यात एका पोलीस कर्मचा-याच्या डोक्याला जखम झाली.परतूरमध्येही दगडफेकपरतूर शहरात सकाळी वाटूर फाटा येथे शिवणगिरीकडे जाणा-या बसवर जमावाने दगडफेक केली. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी दुपारनंतर आगार प्रमुख दिगंबर जाधव यांनी जोखीम घेत काही मार्गावर बस सोडून विद्यार्थ्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली. शहरात सर्वत्र शांतता असल्याचे पोलीस निरीक्षक आर. टी. रेंगे यांनी सांगितले.भोकरदन शहरात निषेध मोर्चाभीमा कोरेगाव येथील घटनेचा मंगळवारी भोकरदन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत शांततेत मोर्चा काढून निषेध करण्यात आला. उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात नगरसेवक दीपक बोर्डे, माजी नगराध्यक्षा रेखा पगारे, गणेश सांबळे, सुभाष साळवे, कैलास पांचगे, सुरेश पैठणे, निर्मलाताई भिसे, ईश्वर पारखे, सुरेश बनकर, युवराज पगारे, प्रकाश सुरडकर, गंगाधर कांबळे, रमेश पगारे, विनोद जाधव, सोनू पगारे, शामराव साळवे, शिवाल मिसाळ, प्रवीण आढावे आदींनी सहभाग घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्षा आशा माळी, नगरसेवक शेख कदिर, संध्या शर्मा, राहुल ठाकूर, रणवीरसिंह देशमुख, संतोष अन्नदाते, शेख जफर आदींनी उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहनशहागड : दलित संघटनांच्या वतीने बुधवारी शहागड बंदची हाक देण्यात आली आहे. पोलीस व व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव येथील घटना ही निषेधार्ह बाब आहे.बुधवारी सकाळी दहा ते बारा वाजेदरम्यान समाज मंदिर ते शहागड बसस्थानक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले. निवेदनावर विलास म्हस्के, अ‍ॅड. अतुल कांबळे, भाऊसाहेब जोगदंड, राजेंद्र वारे, अतुल जोगदंड, संतोष येटाळे, सुरेश येटाळे, विठ्ठल शेळके, दीपक जोगदंड, धम्मदीप येटाळे आदी पदाधिका-यांच्या सह्या आहेत.आज आष्टी बंदआष्टी : आष्टी बाजारपेठ बुधवारी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि विनोद इज्जपवार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर शेकडो आंबेडकरीय अनुयायींच्या स्वाक्षºया आहेत.