शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने कायद्यात फेरफार करणे अयोग्य- हंडोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:40 IST

कायदे मंडळ कायदे निर्माण करण्याचे काम करते. न्यायालयाने कायद्यावर भाष्य करून फेरफार करणे योग्य नाही, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान उद्घाटन प्रसंगी ते रविवारी बोलत होते.

जालना : कायदे मंडळ कायदे निर्माण करण्याचे काम करते. न्यायालयाने कायद्यावर भाष्य करून फेरफार करणे योग्य नाही, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. येथील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान उद्घाटन प्रसंगी ते रविवारी बोलत होते.

अध्यक्षस्थानी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर हे होते. यावेळी डॉ. ह. नि. सोनकांबळे, व्याख्यान मालेचे अध्यक्ष सुभाष मस्के, सचिव सतीश वाहुळे, हरीश रत्नपारखे, मिलींद कांबळे, प्रशांत आढावे यांची प्रमुख उपस्थिती होती. हंडोरे पुढे म्हणाले की, भारताला महासत्ता होण्यासाठी अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जातीयवाद संपविण्याची भूमिका आंबेडकरांनी घेतली होती. आज त्यांच्या भूमिकेचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे हंडोरे यांनी स्पष्ट केले.

राज्यमंत्री खोतकर म्हणाले, की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विज्ञानाचा वारसा जपत समाजाने कर्मकांडातून बाहेर पडावे. ४१ वर्षांपासून सुरू असलेले व्याख्यान मालेचे कार्य आदर्शवत असल्याचे ते म्हणाले. सुभाष मस्के यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप घाटेशाही यांनी सूत्रसंचालन केले तर हरिश रत्नपारखे यांनी आभार मानले. यावेळी अ‍ॅड. बी. एम. साळवे, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, प्रमोद रत्नपारखे, एन. डी. गायकवाड, बबनराव रत्नपारखे, अ‍ॅड. कैलाश रत्नपारखे, प्रा. सुनंदा तिडके, दिगंबर गायकवाड, दीपक डोंके, संजय हेरकर, सुहास साळवे, प्रमोद गायकवाड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

समतेसाठी त्यांच्या हातात बंदुकाभारताच्या राष्ट्रीय सुरक्षे समोरील आव्हाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयांवर डॉ. ह. नि. सोनकांबळे यांनी विचार मांडले. युनोमध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताने चीनला पाठिंबा दिल्यानंतर चीनने भारताला कशा पध्दतीने डिवचले याची उदाहरणे त्यांनी दिली. काश्मीरबाबत ३७० कलमास डॉ. आंबेडकरांनी नकार दिला होता. मात्र तत्कालीन नेतृत्वाने याबाबत गांभिर्य न दाखविल्याने ७० वर्षात आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित न झाल्यामुळे हातात बंदुका घेऊन येथील तरुण समतेसाठी लढत असल्याचे डॉ. सोनकांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयArjun Khotkarअर्जुन खोतकरdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती