शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारा तासांपेक्षा अधिक वेळ चालली मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:56 IST

जालना विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निकाल ५ वाजेच्या आत जाहीर झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निकाल ५ वाजेच्या आत जाहीर झाले. परंतु, निवडणूक विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जालना विधानसभेचा निकाल रात्री १० वाजता जाहीर करण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांसह उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.गुरुवारी विधानसभेचे निकाल जाहीर झाले. या निकालात दिग्जांना धक्के बसले. त्यापैकी एक असलेले शिवसेनेचे उमेदवार माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.जालना विधानसभेचा निकाल देण्यासाठी निवडणूक विभागाने जवळपास १२ तासांचा कालावधी लावला.सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासून मतमोजणी संथगतीने सुरु असल्यामुळे तीन फेऱ्यांना १० ते ११ वाजले. त्यानंतर ११ ते २ वाजेपर्यंत ८ फेरीचे निकाल आले. परंतु, त्यानंतर निकाल उशिरा आल्यामुळे रात्री १० ते ११ वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. रात्री दहा वाजता प्रशासनाने तेविसावी फेरी जाहीर केली. निकाल उशिरा येत असल्याने याचा त्रास माध्यम प्रतिनिधींनाही झाला. अनेक वेळा प्रशासनाला सांगूनही प्रशासनाने निकाल दिला नाही. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.जालना - औरंगाबाद रस्त्यावर वाहतूक ठप्पजालना : मतमोजणी प्रक्रियेमुळे आयटीआय कॉलेजसमोर एकतर्फी वाहतूक करण्यात आली. त्यामुळे सर्व वाहनांना एकाच बाजूने ये-जा करावे लागत होते. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.गुरुवारी जालना विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जालना शहरातील औरंगाबाद - जालना रोडवरील आयटीआय कॉलेज येथे पार पडली. मतमोजणी केंद्र परिसरात काही गोंधळ होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले होते. मतमोजणी दरम्यान जालना - औरंगाबाद रोडवर एका बाजूनेच वाहतूक सुरु होती. या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. एका बाजूने वाहतूक सुरु असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.दिवसभर चाललेल्या मतमोजणीमुळे या मार्गावर अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली होती. परंतु, वाहतूक पोलिसांनी तात्काळ वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल भाले यांच्यासह वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019jalna-acजालनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग