शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

पाण्याच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:58 IST

महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुुरू असल्याने जायकवाडी योजनेची पाईपलाईन फुटल्याने जुना जालना भागाचा पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प झाला आहे. याच मुद्यावर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुुरू असल्याने जायकवाडी योजनेची पाईपलाईन फुटल्याने जुना जालना भागाचा पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प झाला आहे. याच मुद्यावर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांना महिन्याभरापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेच्या वतीने कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा का केला जात नाही, असा सवाल करत नगरसेवकांनी आयोजित न.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सर्व सभापती, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह अधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक शहा आलम खान यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. महिन्याभरापासून जुना जालना भागाला पाणी नाही. पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली नाही. घाणेवाडी तलावातून शहराला पाणीपुरवठा का करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर महावीर ढक्का यांनीही पाण्याचा मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर मुुख्याधिका-यांनी जायकवाडी योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्याचे सांगून आजपासून पाणीपुरवठा सुुरळीत होईल, असे सांगितले.स्वच्छता, वाढीव कर आकारणी, गळती, खातेप्रमुखांची गैरहजेरी इ. मुद्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच विषयपत्रिकेवरील १५ विषयांसह आयत्या वेळच्या दोन विषयांना मंजुरी देऊन सभेचा समारोप केला. नगरसेवक विष्णू पाचफुले, आरेफ खान, शेख शकील, फारूख तुंडीवाले, जयंत भोसले, अरूण मगरे, वैशाली जांगडे, रफिया बेगम, मीना घुुगे आदींनी प्रश्न मांडले. पिंटू रत्नपारखे यांनी केशव कानपुडेंचा मुद्दा उपस्थित करून धारेवर धरले.अधिकारी : कर्मचा-यांवर वचकच नाहीनगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे कार्यालयात नसल्यावर कोणातही अधिकारी कार्यालयात हजर राहत नाही. अधिकारी कामचुकारपणाही करतात. मुख्याधिका-यांचा अधिकारी व कर्मचा-यांवर वचकच राहिला नसल्याचे नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी सांगितले.याला उत्तर देताना मुख्याधिकारी म्हणाले की, जे अधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.वाढीव कर आकारणीमुळे नागरिक हैराणनगर परिषदेच्या वतीने यावर्षी नागरिकांकडून वाढीव कर आकारणी करण्यात येत आहे. परंतु, यातही अधिकारी व कर्मचारी हात साफ करून घेत आहेत. गतवर्षी ७०० रूपयांचा कर असताना यावर्षी २ लाखांचा कर भरून घेतला जात आहे. कर कमी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदWaterपाणीPoliticsराजकारण