शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 01:33 IST

शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काम मागील तीन वर्षांपासून जागेवरच थांबले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काम मागील तीन वर्षांपासून जागेवरच थांबले आहे. नवीन रस्ता तयार करण्यासाठी बांधकाम विभागाने दोनदा निविदा काढत या रस्त्याचे काम करण्यासाठी मुख्य रस्ता हा जागतिक बँकेकडे सोपविला असल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न जाफराबादकरांना पडला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेला शहरातील मुख्य हा रस्ता राहिला नसून, तो पाणंद रस्ता बनला आहे. नव्याने रस्ता करण्याच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण असलेला रस्ता काही वर्षांपूर्वी खोदून टाकलेला आहे. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकापासून शिवाजी चौक ते पूर्णा नदीकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे खोदून काम सुरूही झाले होते. परंतु, मागील तीन वर्षांपासून काम मध्येच थांबले. त्यामुळे व्यापारी आणि ग्रामस्थांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.सद्यस्थितीत जाफराबाद- माहोरा, जाफराबाद- टेंभुर्णी व शहराबाहेर रस्त्याचे काम सुरू आहे. शहरामधील नऊशे मीटरचे काम दुस-याच एजन्सीला देण्यात आले असून, या रस्त्याचे काम आमच्याकडे नसल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे. त्यामुळे अजून किती दिवस या रस्त्याच्या प्रश्न खितपत राहणार, हे अनुत्तरित आहे. सद्यस्थितीत असलेल्या रस्ता अवैध व्यावसायिकांनी व्यापून टाकला आहे. यात पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्यावरच वाहनधारक आपली वाहने उभी करत आहे. याकडे पोलीस प्रशासनासह नगर पंचायतचे दुर्लक्ष होत आहे. एकूणच रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad transportरस्ते वाहतूक