शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ नगरसेवकांचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:51 IST

राखीव असलेल्या प्रभागामधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जालना नगर पालिकेतील जवळपास २२ नगरसेवकांचे पद धोक्यात येवू शकते. असे सुत्रांकडून सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राखीव असलेल्या प्रभागामधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने जालना नगर पालिकेतील जवळपास २२ नगरसेवकांचे पद धोक्यात येवू शकते. असे सुत्रांकडून सांगण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानूसार निवडूण आल्यानंतर संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरसेवकांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तत्पूर्वी या निकालामुळे सर्वात पहिला फटका हा कोल्हापूर येथील महानगरपालिकेच्या २० नगरसेवकांना बसला आहे. जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून वैध ठरवून घेण्यासाठी संबंधीत नगरसेवकांनी आपले प्रस्ताव सादर केले होते. परंतू, या न त्या त्रुटीमुळे हे प्रमाणपत्र वैध ठरवितांना जात पडताळणी समितीसमोर देखील वेगवेगळी कायदेशीर बाजू समोर येत असल्याने प्रमाणपत्राची वैधता तपासतांना आणि त्यावर हे प्रमाणपत्र वैध असल्याचे देतांना अनेक अडचणी येत असल्याचे चित्र आहे.जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ समितीकडे नसल्याने देखील ही प्रमाणपत्रे वैध ठरवितांना अडचणी येत असल्याचे दिसून आले. मध्यंतरी या नगरसेवकांनी आपले जात प्रमाणपत्र वैध करावे म्हणून बराच पाठपूरावा केल्याचे सांगण्यात येते. जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांत सादर न करणाºया नगरसेवकांमध्ये जालना पालिकेतील खालील सदस्यांचा समावेश असल्याची यादी शनिवारी दिवसभर सोशल मिडीयातून व्हायरल झाली. या यादीमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात असून ही यादी नेमकी वैध आहे काय? या बद्दल पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील पालिका प्रशासनाचा विभाग कुठलीच प्रतिक्रिया देण्यास धजावत नव्हता. परंतू, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत जिल्हा प्रशासनाने जालना, परतूर, अंबड आणि भोकरदन येथील नगरपालिका प्रशासनाकडून यादी मागविल्याचे सांगण्यात आले.एकूणच सोशल मिडीयातून व्हायरल झालेल्या यादीमध्ये मिना घुगे, अ‍ॅड.राहूल इंगोले, विजय पांगारकर, खान रुफीया बेगम, शाह आलम खान, आशा ठाकूर, प्रिती कोताकांडा, विणा सामलेट, अरूण मगरे, निखील पगारे, पुनम स्वामी, संगीता पांजगे, स्वाती जाधव, सुमन हिवराळे, पुनम भगत, रमेश गोरक्षक, नंदकिशोर गरदास, रंजना गोगडे, मिनाक्षी खरात, विनोद रत्नपारखे, वैशाली ठोसरे यांचा समावेश आहे. ही नावे शनिवारी दिवसभर चर्चेत होती. या संदर्भात नगरसेवक देखील संभ्रमात असून जात वैधता प्रमाणपत्र तातडीने कसे मिळविता येईल या धावपळीत सर्व जण असल्याचे सांगण्यात आले. येथील समाजकल्याण विभागामधील जात पडताळणी समितीकडे अनेक नगरसेवकांनी आपले मुळ कागदपत्रे तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे पुरावे सादर केल्याचे सांगण्यात आले. जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवण्याचे वेगवेगळे निकष असल्याने समिती देखील चक्रावून गेली आहे. समितीकडे संपूर्ण जिल्ह्याचा पदभार असल्याने विद्यार्थ्यांसह राजकीय मंडळींची मोठी गर्दी सध्या या विभागात आहे.काही अंशी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी या प्रमाणपत्राची गरज पडते. हे प्रमाणपत्र प्रवेशासाठी हवे असल्यास त्याला मुदत वाढ देण्यात आली आहे. ज्यावेळी प्रवेश निश्चित होईल त्यानंतर तीन महिन्यांनी हे प्रमाणपत्र देण्यासाठीची मुदत अनेक शासकीय तसेच निमशासकीय विद्यालय, महाविद्यालयांनी दिली असल्याचे सांगण्यात आले.प्रश्न कायम : पोट निवडणूक की पद रद्द !जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्यावरून सध्या सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने आता या नगरसेवकांचे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत यामधील सदस्यांचे सदस्यत्व रद्द होणार की, त्या ठिकाणी पुन्हा नव्याने पोट निवडणूक होणार काय या बद्दलही साशंकता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदCaste certificateजात प्रमाणपत्र