जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तिघांचा शनिवारी मृत्यू झाला. तर शनिवारीच ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर २१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार ४३२ वर गेली असून आजवर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार ६६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना शहरातील ४४, तर तालुक्यातील नागेवाडी येथील एकास कोरोनाची बाधा झाली. मंठा तालुक्यातील किराळा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परतूर शहरातील ९ जणांना कोरोनाची लागण झाली. घनसावंगी तालुक्यातील नागोबाची वाडी १, गुरुपिंप्री येथील एकास कोरोनाची बाधा झाली. अंबड शहरातील २ तर तालुक्यातील हस्तपोखरी येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद शहरातील येथील एकास कोरोनाची बाधा झाली. भोकरदन शहरातील १, तालुक्यातील बरंजळा लोखंडे १, चोºहाळा २, जाळीचा देव येथील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील ३ तर मुंबई येथील एकास कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात सध्या २० हजार ४९० रुग्ण संशयित आहेत. शनिवारी ५६४ जणांच्या लाळेच्या नमुनाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.