अध्यक्षपदी बरमोटा, तर कुदाल कार्याध्यक्ष
जालना : शहरातील श्री महर्षी दाधिच सेवा समितीची भगवानदास जोपट यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत निवडण्यात आलेल्या समितीत अध्यक्षपदी नारायण बरमोटा, कार्याध्यक्षपदी सुरेश कुदाल, उपाध्यक्षपदी रमेश बरमोटा, सचिवपदी अमोल नामावाल, सहसचिवपदी राहुल तिवाडी, कोषाध्यक्ष राजेंद्र ईनानी यांची निवड झाली. तसेच समिती सदस्यांचीही निवड झाली.
मोकाट जनावरांमुळे ज्वारीचे मोठे नुकसान
पारडगाव : घनसांवगी तालुक्यातील पारडगाव शिवारातील ज्वारीसह इतर पिकांचे मोकाट जनावरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. येथील शेतकरी रफिक अमिन कुरेशी यांच्या गट नंबर ४६२ मधील शेतातील शाळू ज्वारीचे पीक मोकाट जनावरांनी खाऊन फस्त केले. यात कुरेशी यांचे मोठे नुकसान झाले असून, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.