जालना : जिल्ह्यातील नऊजणांचा कोरोना तपासणीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे; तर कोरोनामुक्त झालेल्या १५ जणांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
बाधितांमध्ये जालना तालुक्यातील पानगाव येथील एकाचा समावेश आहे; तर अंबड शहरातील चौघांना बाधा झाली आहे. तालुक्यातील आपेगाव येथील एक, साडेगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जाफराबाद तालुक्यातील बेलोरा येथील एक, तर बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील ११ जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील दोघांवर जालना येथील राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉकमध्ये, तर नऊजणांवर अंबड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात उपचार केले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ६४८ वर गेली असून, त्यातील ११८२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजवर ६० हजार ३४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.