शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
4
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
5
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
6
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
7
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
8
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
9
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
10
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
11
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
12
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
13
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
14
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
15
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
16
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
17
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
18
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
19
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
20
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी

कोरोनातही सराफा बाजारात धनवर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:13 IST

कोरोनाने संकटात सापडलेले उद्योग दिवाळीच्या तेजाने जणू काही उजळून निघाले असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.

ठळक मुद्देदागिन्यांसह महालक्ष्मीच्या प्रतिमेला मागणी

जालना : कोरोनाचे मळभ दूर झाल्याचे चित्र शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी दिसून आले. धनत्रयोदशीला सोने  आणि चांदी हे मौल्यवान धातू खरेदीला अनन्यसाधारण महत्व हिंदू संस्कृतीत आहे. हे  महत्व लक्षात घेऊन जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये कोट्यवधी रूपयांची सोने खरेदीची उलाढाल झाल्याचे दिसून आले. 

दिवाळीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून बाजार गर्दीने फुलला आहे. यात नवीन कपडे, पूजेचे साहित्य, तसेच सोने, चांदी, रेफ्रीजरेटर, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, यासह मोबाईलच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. विविध दुकानदारांनी तसेच उत्पादक कंपन्यांनी खरेदीवर भरमसाठ डिस्काऊंट  दिल्याने देखील खरेदीचा उत्साह बाजारात दिसून आला. कोरोनाने संकटात सापडलेले उद्योग दिवाळीच्या तेजाने जणू काही उजळून निघाले असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. दरम्यान शुक्रवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम  ५१ हजार २०० एवढे होते. तर चांदीचे दर हे ६४ हजार प्रति किलो एवढे होते. धनत्रयोदशीला एक ग्रॅम का हाेईना सोने खरेदी करण्यास मोठे महत्व आहे.

आजच्या दिवशी मौल्यवान वस्तुंची खरेदी केल्यास वर्षभर चणचण जाणवत नाही, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आज सहा ते सात महिने शुकशुकाट असलेल्या सराफा बाजारात पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र होते. गाडी पार्किंग करण्यासाठी अनेकांची कसरत झाली. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्याने मोठे संकट आले होते. परंतु सरकारने जाहीर केलेली मदत खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून का होईना सोने, चांदी खरेदीचा मुहूर्त साधला. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेला कापूस शेतकऱ्यांच्या घरात पोहचला आहे. परंतु सध्या कापूस खरेदी करण्यात येत नसल्याने तो घरातच पडून आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, वाहन बाजारात तेजी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी मुहूर्त असतो. तो मुहूर्त यंदाही नागरिकांनी साधला आहे. सोन्या- चांदीच्या दरात दिवाळीच्या तोंडावर घसरण झाल्याने देखील खरेदीत वाढ झाल्याची माहिती सुखदेव ज्वेलर्सचे ओंकार गिंदोडिया यांनी सांगितले. वाहन खरेदीकडे अनेकांचा कल आहे. अनेकांनी वाहनांची बुकिंग केली असली तरी ते नवीन कार, दुचाकी पाडव्याच्या दिवशी घरी नेणार असल्याचे कमिटमेंट केले असल्याची माहिती अंबरीश बजाजचे संचालक रघुनंदन लाहोटी यांनी सांगितले. 

घर खरेदीला प्राधान्य राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कमी केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये घर-खरेदी विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. तसेच नवीन घरांच्या प्रकारात बंगलोज, वन, टू. बीएचके फ्लॅट खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. विविध बँका तसेच वित्तीय संस्थांनी गृह प्रकल्पांसाठी त्यांच्या व्याजदरात कपात केली असून, होमलोन एका दिवसात मंजूर होत असल्याने ग्राहकांचा कल नवीन घर खरेदीकडे आहे. - अभय पाथरवालकर, संचालक, विठ्ठला गृहप्रकल्प, जालना

टॅग्स :JalanaजालनाMarketबाजार