शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनास सहकार्य करावे - रवींद्र बिनवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:50 IST

राजकीय पक्ष प्रतिनिधींनी निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जालना लोकसभा मतदारसंघासाठी २८ मार्च २०१९ रोजी पासून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल आहे. राजकीय पक्ष प्रतिनिधींनी निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांच्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीमध्ये भास्कर आंबेकर, राजाभाऊ देशमुख, राजेंद्र राख, तय्यबबापू देशमुख, अनिल मिसाळ, हिवाळे, सूर्यकांत कलशेट्टी, दीपक रणनवरे, सुरेश कदम आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले, निवडणुकीदरम्यान आदर्श आचार संहितेचे सर्व पक्षांनी पालन करावे. निवडणुकीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आयोगाकडून संगणकीय अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करुन देण्यात येणार असुन, याचा वापर राजकीय पक्षांनी करण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी कार्यालयातसुद्धा परवानग्यांसाठी कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे सांगितले. उमेदवारांना ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. यापेक्षा जास्त खर्च होऊन आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही.याबाबत काळजी घेण्यात यावी. आचारसंहिता अंमलबजावणीकरिता राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

टॅग्स :Jalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक