शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींचे संधीत रुपांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:23 IST

नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जगाच्या बाजारपेठेत पूर्वी आपल्या देशाचा वाटा ३३ टक्के म्हणजे एक तृतीयांश एवढा होता. आजघडीला मात्र आपल्या देशाचा वाटा घसरून केवळ ३ टक्केच राहिला आहे. त्यामुळे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, हे आता आपल्याला केवळ म्हणून चालणार नाही तर सर्वांनी आपल्या कृतीतून ते सिध्द करून दाखविण्याची गरज आहे. नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले.कै. दत्ताजी भाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ समारोहानिमित्त गुरुवारी कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलाच्या वतीने अंबड येथील पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात उद्योजक प्रसाद कोकीळ यांचे ‘उद्योजगतेकडून संपन्नतेकडे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भाला तर प्रमुख पाहुणे म्हणून द्वारकादास मंत्री यांच्यासह अ‍ॅड. आर. आर. कुलकर्णी, केदार मंत्री, तुकाराम तौर, दीपकठाकूर, द्वारकादास जाधव, रमेश शहाणे, गंगाधर वराडे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना कोकीळ म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत अमेरिका, चीन, युरोप आदी देशांचा वाटा वाढत चालला आहे. मात्र आपल्या देशाची होत असलेली घसरण आपण रोखू शकलो नाही. कारण आपली मानसिकता कमकुवत झाली आहे. आपण पूर्वी बलवान, सुखी, समृद्ध, संपन्न होतो, हेच विसरून गेलो आहे. आपल्या देव-देवता सोन्याने सजलेल्या संपन्न असतांना तसेच आपल्या संस्कृतीत संपन्नता भिनलेली असतानाही आपण संपन्नतेकडे वाटचाल करताना एवढी कच का खात आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :businessव्यवसायMIDCएमआयडीसीSocialसामाजिक