शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

जालन्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:37 IST

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आत वेगात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील काँग्रेसचे हे सर्व नेते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.जालना लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या धर्मात काँग्रेसला सुटलेला आहे. त्यातच १९९६ नंतर येथे काँग्रेस उमेदवाराला भाजपच्या विरोधात पराभवच पत्करावा लागला. यावेळी मात्र काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. मध्यंतरी शिवसेनेचा बडा नेता काँग्रेसमध्ये येणार म्हणून जोरदार चर्चा होती, परंतु त्या चर्चेला आता जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवारी संदर्भात चाचपणी सुरू केली असून, आ. कल्याण काळे यांचे नाव आघाडीवर आहे.असे असले तरी जालन्यातील नेते जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस समितीचे केंद्रीय सदस्य तथा माजी सभापती भीमराव डोंगरे, माजी आ. कैलास गोरंट्याल, शहराध्यक्ष शेख महेमूद, प्रभारी मनोज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य कल्याण दळे आदी नेते मुंबईत तळ ठोकून आहेत.आ. कल्याण काळे यांनी २००९ मध्ये खा. रावसाहेब दानवे यांना जबरदस्त टक्कर देत त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. काळे यांचा पराभव हा केवळ साडे आठ हजार मतांनी झाला होता. त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वमान्यता असल्याचे बोललले जात आहे.मात्र कल्याण काळे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु जर काँग्रेस हाय कमांडने सांगितल्यावर त्यांना मैदानात उतरावेच लागेल असे सांगण्यात येते. जर कल्याण काळे यांनी नकार दिल्यास पर्याय म्हणून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य तथा माजी सभापती भीमराव डोंगरे यांना उमेदवारी देण्याची मागणी जालन्यातील हे नेते प्रदेशाध्यक्ष चव्हाणांकडे करणार असल्याचे सांगण्यात आले.भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच माजी आ. अरविंद चव्हाण यांनी प्रवेश केला आहे. तर काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले अंबडचे माजी आ. अ‍ॅड. विलास खरात हे पुन्हा घर वापसीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा असून, काँग्रेसकडून थेट खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी लॉबिंग सुरू केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक