कारवाईची मागणी
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील अनेक वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली असून, अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, नियम मोडून वाहने चालविणारे हे चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई मोहीम राबविण्याची गरज आहे.
पथदिवे दिवसा सुरूच
जालना : शहरातील विविध भागातील पथदिवे दिवसाही सुरू राहत आहेत. दुसरीकडे काही भागातील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी त्या भागातील नागरिकांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नगरपालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दिवसा सुरू राहणारे पथदिवे बंद ठेवावेत, ज्या भागात पथदिवे नाहीत, अशा ठिकाणी पथदिवे लावावेत, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.