शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण व पालिकेत बिलावरून सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:33 IST

शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहागड-जालना या पाच वर्षांपासून बंद पाईपलाइनचे ५१ कोटींची थकित वीज भरण्यासाठी महावितरणने नगरपालिकेला नोटीस बजावली आहे. बिल न भरल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महावितरणची ही मनमानी असून याविरुद्ध आपण जलआंदोलन छेडणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. अंबड नगरपालिकेला पाणी देण्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत भूमिका मांडली. शहागड-अंबड-जालना ही योजना जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून पूर्णत: बंद आहे. असे असतानाही महावितरणने नगरपालिका तब्बल पाच वर्षांनंतर थकित वीजबिल भरण्याबाबत नोटीस पाठवली आहे. योजनेच्या अंबड येथील मीटरवर (क्र.५१००१९००५१०९) १७ कोटी, ४२ लाख ५६ हजार २१८ रुपये आणि शहागड येथील जोडणीवर (क्र. ५१००१९००५०९५) ३३ कोटी, ९५ लाख ३६ हजार रुपये, अशी एकूण ५१ कोटी ३७ लाख ९२ हजार २२० रुपये थकबाकी आहे. दोन्ही ठिकाणच्या जोडण्या कायमस्वरुपी खंडित आहेत. त्यामुळे थकित देयके सात दिवसांत भरावीत अन्यथा थकित रक्कम सध्या जायकवाडी योजनेसाठी सुरू असलेल्या फिल्टरबेड व मस्तगड येथील मीटरवर समायोजित करण्यात येईल, असे नोटिसीत नमूद आहे. महावितरणने ही नोटीस देण्याबाबत पालिकेला कुठलीही माहिती दिली नाही. शिवाय थकित बिलाची कुठलीही कॉपी सोबत पाठवलेली नाही.जालना नगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याचे थकित वीजबिल एकरकमी भरले. सध्या नियमित बिल अदा केले जात आहे. मात्र, महावितरणने भाजप,सेनेच्या राजकीय दबावातून ही नोटीस पाठवली आहे. महावितरणच्या या मनमानीविरुद्ध जनआंदोलन छेडणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. सत्ताधारी नेते जालना पालिका प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. या वेळी नगरसेवक जगदीश भरतिया, शेख महेमूद यांची उपस्थिती होती.जालन्याची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता अंबडला पाणी देण्याचा कुठलाही करार जालना पालिका करणार नाही. अंबडला केवळ व्यावसायिक दराने पाणी दिले जाईल, असे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. शहागड-जालना अंबड योजेतून अंबडने कुठलाही खर्च न देता अनेक वर्ष फुकट पाणी घेतल्याचा आरोप त्यांनी केला.