शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानावर समितीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:17 IST

शहर कचरामुक्त करण्यासाठी वॉर्डनिहाय कमिटी स्थापन करुन अभियान यशस्वी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसहभागाशिवाय कुठलीही योजना वा उपक्रम यशस्वी होत नसल्याचा पूर्वानुभव पाहता स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानात जालना शहराचा ठसा उमटविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने कंबर कसली आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी वॉर्डनिहाय कमिटी स्थापन करुन अभियान यशस्वी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. वॉर्डांतील कमिटीच स्वच्छतेवर लक्ष ठेवणार असून, स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींसाठी नागरिकांना आवाहन केले जाणार आहे.शहरात मागील निवडणुकीवेळी वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली असून, आता लोकसंख्येनुसार ६१ वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत. गतवर्षीची निवडणूक प्रभागनिहाय घेण्यात आली असली तरी स्वच्छतेची कामे, ही वॉर्डनिहाय केली जाणार आहेत.स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ अभियान राबविले जात आहे. यासाठी केंद्राकडून कोट्यवधींचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जात आहे. या निधीतून कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाºयांची भरती आणि स्वच्छतेचे साहित्य व सामुग्री खरेदी केली जात आहे.केंद्र शासनाने स्वच्छतेच्या आॅनलाईन तक्रारीसाठी अ‍ॅपही विकसित केले आहे. याद्वारे नागरिकांना आपल्या भागातील स्वच्छतेबाबत तक्रारी नोंदविण्याची सुविधा आहे. जालना पालिकेने एक पाऊल पुढे टाकत स्वच्छता अभियानात नागरिकांना सहभागी करुन अभियान यशस्वी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. शहरातील ६१ वॉर्डांत स्वतंत्र कमिट्या तयार करण्यात येणार असून, याची जबाबदारी त्या त्या वॉर्डातील नगरसेवकावर सोपवली जाणार आहे. वॉर्डाची भौगोलिक व इत्थंभूत माहिती नगरसेवकास असल्याने स्वच्छतेची कामे त्यानुसार केली जाणार आहेत. वॉर्डात किती हॉटेल्स, दुकाने, हॉस्पिटल्स, शाळा व वसाहती आहेत, याची माहिती नगरसेवकांना असते. त्यामुळे स्वच्छतेचे काम योग्य रीतीने होऊ शकणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी एकत्र आले तर स्वच्छता अभियान यशस्वी होऊन शहराचा लौकिक सर्वदूर पोहोचणार आहे.