शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आधी सत्तेत तर या मग आरक्षण रद्द करण्याचे बोला; मनोज जरांगे यांची राहुल गांधींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:10 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू; जरांगे यांचा निशाणा

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : काय करायचं करा, सत्ता आली तर पाहिजे ना, सत्ता येण्याच्या आधीच आरक्षण कसे रद्द करता, अशी बोचरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी कॉँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केली. आज दुपारी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. 

राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केले होते. यावरून वादंग उठले आहे, यावर मराठा आरक्षण नेते जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे म्हणाले, ''ते परदेशात बोलले की समुद्रात उभे राहून माहिती नाही. त्यांचा राजकीय मामला आहे, त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. काय करायचं करा, सत्ता आली तर पाहिजे ना, सत्ता येण्याच्या आधीच कसे रद्द करणार आरक्षण'' 

राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेतसेच बार्शीचे आमदार राऊत यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे, याचा वर जरांगे यांनी तीव्र शब्दात टीका केली. ''गोरगरिबांच्या लोकांसाठी आम्ही लढत आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत. समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहित आहे,समाज हुशार आहे, समाज सगळं बघतोय'' अशी टीका करत राजकीय पक्षाचे जोडे उचलणारे, राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले, किती गेले, ही सगळी भाजप संपणार आहे, असा इशारा जरांगे यांनी दिला.  ... तुमचे राजकीय करियर बाद करतोमाझं काम आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हे माझे कर्तव्य आहे. मी कोणत्याही आंदोलनाला थेट बसून जातो,कोणी यावं म्हणून मी आंदोलन करत नसतो. कोणी लक्ष द्यावं म्हणून काही करत नाही, एक वर्ष झालं मी समाजासाठी आंदोलन करतो, मी कसला विचार करत नाही. कोण येणार आहे, कोण येणार नाही हे न पाहता आंदोलन करतो असे जरांगे यांनी स्पष्ट करत थोडे थांबा तुमचा राजकीय करियर बाद करतो, असे आव्हान प्रसाद लाड यांना दिले. 

असलं रडकं सरकार केव्हाच नाही बघितलंफडणवीस साहेब खूप हुशार आहेत. चाणक्य आहेत असं वाटायचं. परंतु, ते फक्त फोडाफोडीत हुशार आहेत. भाजपाचेच लोक त्यांचा कार्यक्रम लावणार आहे. तुम्ही आरक्षण देऊन टाका. फडणवीस साहेब तुम्हाला इमानदारीने सांगतो. तुम्हाला विरोधक, शत्रू मानलेलं नाही. तुम्ही आरक्षण देऊन टाका. समाज तुमचा फायदा करेल, तुम्ही नाही दिलं तर खेळखल्लास, असा इशारा जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी