शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित वर्ग ‘सायबर क्राईम’च्या जाळ्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:05 IST

सुशिक्षित आता सायबर क्राईमच्या जाळ्यात येत असल्याचे चित्र मागील अडीच वर्षात दाखल गुन्ह्यांवरून दिसते.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आॅनलाईन व्यवहार करण्यावर सुशिक्षितांनी भर दिला. मात्र, हेच सुशिक्षित आता सायबर क्राईमच्या जाळ्यात येत असल्याचे चित्र मागील अडीच वर्षात दाखल गुन्ह्यांवरून दिसते. या कालावधीत १३ जणांच्या बँक खात्याची माहिती घेऊन त्यांना जवळपास १८ लाखांचा चुना चोरट्यांनी लावला आहे.पूर्वी बहुतांश ग्राहक थेट बँकेत जाऊन व्यवहार करीत होते. मात्र, इंटरनेटचा वाढलेला वापर आणि केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमानंतर आॅनलाईन व्यवहारावर सुशिक्षितांनी मोठा भर दिला. त्यातच विविध कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवर विविध आॅफर देण्यास सुरू केली. त्यामुळे आॅनलाईन साहित्य खरेदीकडेही कल वाढला आहे. मात्र, आॅनलाईन व्यवहार करताना दक्षता न घेणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे सायबर चोरांच्या जाळ्यात असे ग्राहक सहजपणे अडकू लागले आहेत.२०१७ ते जून २०१९ या कालावधीत दाखल १८ गुन्ह्यांचा तपास सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. दाखल गुन्ह्यांपैकी १३ प्रकरणांमध्ये फेक कॉल करून खोटे आमिष दाखविणे, आॅनलाईन खोट्या जाहिराती देऊन बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रकार घडला आहे. २०१७ मध्ये एकाला कमी किमतीच्या आय-फोनच्या मोहात ८ हजार रूपयांना आॅनलाईन चुना लागला आहे. २०१८ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील ६ प्रकरणांत आॅनलाईन लूट झालेली आहे. यात १५ हजार ते दीड लाख रूपयापर्यंतची रक्कम लंपास झालेली आहे. तर चालू वर्षात आजवर सायबर क्राईमचे सहा गुन्हे दाखल झालेले आहेत. विशेषत: या सर्व सहा जणांचीही आॅनलाईन फसवणूक झाली आहे. १० हजार ते १२ लाख रूपयांची रक्कम खात्यातून लंपास करण्यात आली आहे. या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी आॅनलाईन व्यवहार करताना दक्षता घेणे गरजेचे आहे.फेक कॉलवर दिली जाते ओटीपी, बँक खात्याची माहिती‘फेक कॉल’द्वारे दिल्या जाणा-या आमिषालाही अनेक जण बळी पडत आहेत. कमी किंमतीत चांगली वस्तू मिळणे असो किंवा नोकरी मिळणे असो हे संबंधितांच्या अंगाशी येत आहे.ओटीपीसह बँक खात्याची माहिती मागितल्यानंतर सुशिक्षित ग्राहक अनोळखी व्यक्तीला माहिती देत आहेत. त्यामुळे फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून, ग्राहकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.आक्षेपार्ह मजकूरही अंगलटव्हाटस् अ‍ॅप, फेसबुक इ. सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. मात्र, बनावट खाती काढून एखाद्याची बदनामी करणारे किंवा आक्षेपार्ह मजकूर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.अशा मजकुरामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडूनच आता सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात असून, आक्षेपार्ह मजकूर टाकणा-या ६ जणांवर मागील अडीच वर्षात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.२ लाख ८० हजार ‘रिकव्हर’आजवर दाखल सायबर गुन्ह्यांमध्ये जवळपास १८ लाख ४१ हजार रूपयांचा चुना संबंधितांना लागला आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या तपासात जवळपास २ लाख ८० हजार रूपये रक्कम परत मिळविण्यात आली आहे. मात्र, अशा आॅनलाईन व्यवहारात अनेकांची नावे, बँक खाती बनावट असल्याने चोरट्यांचा तपास लागणे मुश्किल होत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीJalna Policeजालना पोलीस