शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिरची बाजाराला वातावरणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:21 IST

वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटका बसला.

गजानन वानखडे/जालना : वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटका बसला.निव्वळ वातावरण खराब मिरची ओलसर असल्याचे कारण पुढे करत मिरची व्यापा-यांनी मिरचीचे पाडले. परिणामी दहा ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल विकल्या जाणारी मिरची साडेसात ते आठ हजार रूपये प्रति क्विंटल दराने नाईलाजाने शेतक-यांना विकाली लागल्याने मिरची उत्पादक शेतक-यांना तब्बल दोन ते अडीच हजार रूपयाचे नुकसान सहन करावे लागले. दर मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणा-या मिरची बाजारात जालना जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लाल मिरची विक्रीस आणतात. गत दोन वर्षापासून मिरचीवर पडलेल्या रोग आणि योग्य भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादन शेतकरी हैराण झाले होते. सध्या मार्च एप्रिल २०१७ मध्ये लागवड केलेली लाल मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. दहा ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल लाला मिरचीला भाव येत असल्याने मिरची बाजारात गेल्या आठवड्यात २००० हजार पोते लाल मिरचीची चागली आवक झाली होती. मिरची सर्वांधीक ११ हजार रूपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला होता. मात्र काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे मिरचीचा ऊन न मिळाल्याने मिरची चामट झाली आहे. मात्र मिरचीच्या दर्जा मात्र कायम आहे. असे असतांना व्यापा-यांनी चांगली मिरची कमी दराने मांगितल्याने शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.............................काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि गारपिट आणि पावसामुळे लाल मिरची ओलसर झाली आहे. मिरचीची गुणवत्ता पाहून मिरची खरेदी करण्यात येत आहे.- इस्माईल शेख, मिरची व्यापारी