शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकांच्या पतीराजांच्या चमकोगिरीला ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:21 IST

जालना : पत्नी नगरसेविका असताना आपण नगरसेवक असल्याच्या तो-यात राहून नगर पालिकेच्या कामात हस्तक्षेप करणा-या पतीराजांच्या मनमानीला आता ब्रेक ...

जालना : पत्नी नगरसेविका असताना आपण नगरसेवक असल्याच्या तो-यात राहून नगर पालिकेच्या कामात हस्तक्षेप करणा-या पतीराजांच्या मनमानीला आता ब्रेक लागणार आहे. नगर परिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करणा-या पतीराजांवर आता नगरविकास विभागाकडून कारवाई केली जाणार असून, तसे आदेशच सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिका-यांना देण्यात आले आहेत.या संदर्भात नगविकास शाखेच्या जिल्हा प्रशासन अधिका-यांनी जालना, अंबड, परतूर, भोकरदन नगर पालिका तसेच बदनापूर, घनसावंगी, मंठा व जाफराबाद नगरपंचायतींच्या मुख्याधिका-यांना आदेश दिले आहेत. महिलांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामात सहभाग वाढावा, ग्रामीण तसेच शहरी भागाच्या विकासात महिलांना प्रत्यक्ष सहभाग घेता यावा, या हेतूने महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, ज्या महिला स्थानिक स्वराज्य संंस्था तसेच नगरपालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून जातात, अशा महिलांचे पती ग्रा.पं., जि. प., नगरपंचायत तसेच नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतात. आपणच नगरसेवक असल्यासारखे वागून अधिकारी आणि कर्मचा-यांवर दबाव टाकतात. नियमबाह्य कामे करून घेतात. हे थांबविण्यासाठी नियमबाह्य हस्तक्षेप करणा-या नगरसेविकांच्या पतींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास शाखेच्या जिल्हा प्रशासन अधिका-यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.--------------नगराध्यक्षांऐवजी पतींची हजेरीआठवडाभरापूर्वी पालकंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा नियोजन सभागृहात नगरपालिका व नगरपंचायतींच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत सातपैकी तीन नगराध्यक्षांऐवजी त्यांचे पती हजर राहिले. तर पंचवीस नगरसेविकांऐवजी त्यांच्या पतींनी बैठकीत सहभाग घेतला. याबाबत अधिका-यांनी विचारणाही केली. मात्र, महिला असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत, असे मोघम उत्तर पतीराजांनी दिल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.