शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सहा कोटींचा गंडा; २५६ जणांचे जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:52 IST

जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांचे सहा कोटी रूपये घेऊन त्याचा परतावा न देता कंपनीने गाशा गुंडाळला आहे. या प्रकरणी ठेवीदाराच्या तक्रारीवरून राजस्थानमधील चार आणि महाराष्ट्रातील एका विरूद्ध यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत २५६ गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवण्याचे काम पूर्ण झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार गुंतवणूकदारांचे सहा कोटी रूपये घेऊन त्याचा परतावा न देता कंपनीने गाशा गुंडाळला आहे. या प्रकरणी ठेवीदाराच्या तक्रारीवरून राजस्थानमधील चार आणि महाराष्ट्रातील एका विरूद्ध यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत २५६ गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवण्याचे काम पूर्ण झाल्याचे पोलीसांनी सांगितले.मध्यप्रदेशातील इंदूर येथे कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत कंपनी गरीमा रिअल इस्टेट, गरीमा फोम आणि साक्षी मल्टिस्टेट सोसायटी या तीन वेगवेगळ्या नावाने कंपन्या दाखवून जालना जिल्ह्यात २०१० ते २०१५ या काळात जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार लोकांकडून अडीच हजार ते पाच हजार रूपये किंवा त्यापेक्षा जास्त ठेवी तसेच आरडी जमा केल्या होत्या. त्या सर्व ठेवींवर सरासरी १२ ते १५ टक्के व्याजदार देण्यासह निवृत्तीवेतन योजनाही राबवणार आमिष दाखवून कंपीनने म्हटले होते.मात्र, मुदत संपल्यानंतर पैसे मिळावेत म्हणून गुंतवणूकदारांनी पाठपुरावा केला असता, कंपनीने उडवाउडवीची उत्तरे देण्यासह कुठलाच प्रतिसाद दिला नाही. यावरून जालन्यातील गुंतवणूकदार मारूती ढोणे यांनी कदीम जालना ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास जालन्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपविभागीय अधिकारी एस.डी. बांगर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यात बांगर यांनी सांगितले की, आता पर्यंत जवळपास २५६ पेक्षा अधिक गुंतवणुकदारांचे जबाब नोंदवले असून, त्यांना देण्यात आलेले गुंतवणुकीच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती हस्तगत केल्या आहेत. या कंपनीचे मुख्य कार्यालय हे औरंगाबादेतील बन्सीलालनगर येथे होते. तेथील व्यवस्थापन जळगाव येथील धीरज गुलाबसिंग पाटील हे पाहत होते. नातेवाईकांमुळेच अनेकांनी केली गुंतवणूक४या व अशा अनेक प्रकरणांमध्ये जवळच्या नातेवाईकांचा असलेला हट्ट नडत असल्याचे समोर आले. ज्यावेळी गुंतवणूकदारांचे जबाब घेतले जात आहेत, त्यावेळी ही बाब प्रकर्षाने पुढे आल्याची माहिती तपास अधिकारी बांगर यांनी सांगितली. आता या गंभीर प्रकरणात आम्ही राजस्थानला जाऊन येणार असल्याचेही बांगर यांनी स्पष्ट केले. एकूणच ही व्याप्ती वाढेल असेही ते म्हणाले.या प्रकरणात कदीम पोलीस ठाण्यात राजस्थानमधील धोलपूर येथील बनवारीलाल माधवसिंह कुशवाह, शिवराम माधवसिंह कुशवाह, बालकिशन कुशवाह, बनवारीलाल लोधीसह धीरज पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता

 

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक