शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

आयोगाच्या अध्यक्षांनी बैठक अर्धवट सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:26 IST

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक न घेताच तेथून निघून जाणे पसंत केल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात योजनांचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. मात्र जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओ, पोलीस अधीक्षकांसह अन्य विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे आढावा कोणाकडून घ्यावा आणि सूचना कोणाला द्याव्यात या मुद्यावरून शेख हे जाम चिडले होते, त्यांनी बैठक न घेताच तेथून निघून जाणे पसंत केल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली.अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौºयावर आले होते. त्यांनी सकाळी शासकीय विश्रामगृहात ख्रिश्चन, जैन, मुस्लिम तसेच अन्य समाजातील शिष्टमंडळा सोबत चर्चा केली. त्यावेळी अनेकांनी स्मशानभूमीचा मुद्दा तसेच रस्ते, दलित वस्तीची कामे, विद्यार्थ्यांना श्ौक्षणीक कर्ज घेतांना बँकांकडून अडवणूक केली जाते, असा अडचणींचा पाढा वाचला. या सर्व बाबींचे निवेदनही अध्यक्ष शेख यांना यावेळी देण्यात आले. निवेदनांवर अभ्यास करून आपण संबंधित विभागांना तशा सूचना देऊ, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.समाज बांधवांशी संवाद साधल्यावर दुपारी दोन वाजता अध्यक्ष शेख हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे केवळ सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी कमलाकर फड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शेख यांनी जिल्हाधिकारी तसेच सीईओ आणि अन्य वरिष्ठ अधिकारी कोण-कोण हजर आहेत, याची विचारणा केली असता, जिल्हाधिकारी हे पुणे येथे निवडणूक कामानिमित्त गेले असल्याचे सांगण्यात आले. तर अप्पर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी हे देखील दौ-यावर असल्याचे सांगण्यात आले. पोलीस दलातील एकही वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे चिडून जाऊन अध्यक्ष शेख यांनी बैठक घेण्यात काय अर्थ आहे, असे म्हणत बैठक अर्धवट सोडली.मुख्यमंत्र्यांना अहवाल देणारआपण दौ-यावर येणार असल्याची माहिती रीतसर प्रशासनाला कळवली होती. आपण आतापर्यंत २६ जिल्ह्यांचा दौरा केला, परंतु असा अनुभव कुठेच आला नाही. मात्र येथे अधिका-यांना त्यांच्या जबाबदारीचे भान नसल्याचे येथे दिसून आले. त्यामुळे गैरहजर कर्मचा-यांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. तसेच खुलासा योग्य असल्यास ठीक नसता, त्यांच्याविरूध्द रीतसर कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :GovernmentसरकारJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना