शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या आदेशाला बीडीओ जुमानेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:43 IST

सीईओंच्या आदेशाला जर प्रशासन जुमानत नसेल तर सर्वसामान्यांनी कोणाकडे दाद मागावी अशी खंत दिव्यांगानी व्यक्त केली.

दिगंबर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : दिव्यांगाना देण्यात येणारा तीन टक्के निधी तातडीने वाटप करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी यापूर्वीच त्या -त्या तालुक्याच्या बीडीआेंना दिले आहेत. असे असतांना घनसावंगी तालुक्यात दिव्यांगाचा निधी वाटपात हलगर्जीपणा होत, असल्याने दिव्यांगांमध्ये संतापाची लाट आहे. सीईओंच्या आदेशाला जर प्रशासन जुमानत नसेल तर सर्वसामान्यांनी कोणाकडे दाद मागावी अशी खंत दिव्यांगानी व्यक्त केली.ग्रामपंचायतीला चौदाव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून दिव्यांगासाठी तीन टक्के निधी राखीव ठेवून त्यांना वाटप करण्याचे शासनाचे आदेश आहेत. यामुळे कुंभारपिंपळगाव येथील ३५ दिव्यांगासाठी १ लाख ६२ हजार निधीची तरतूद करण्यात आली. निधीचे वाटप करताना बीडीओ, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षऱ्यानी निधीचे वितरण होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून निधी मंजूर असूनही तो दिव्यांगांना वाटप करण्यात प्रशासनाकडून टोलवा टोलवी सुरु असल्याने सहा महिन्यापासून दिव्यांग नागरिकांची गैरसोय सुुरु आहे. विशेष म्हणजे जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी दोन महिन्यापूर्वीच संबंधित तालुक्याच्या बीडीओंना पत्र देऊन दिव्यांगांच्या निधीचे तातडीने वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याला बीडीओकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.कुंभार पिंपळगाव येथील सरपंच आणि ग्रामसेवक हे सुध्दा दिव्यांगाची निधीबाबत काहीच माहिती सांगत नसल्याचा आरोप गावातील दिव्यांगांनी केला आहे. मंगळवारी दिव्यांगांनी ग्रा.पं. कार्यालयासमोर आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला होता.आचारसंहितेचा विषयच नाहीआचारसंहिता लागण्यापूर्वीच दिव्यांगाचा निधीचे वितरण करण्याचे आदेश मी संबंधित बीडीओंना लेखी पत्राव्दारे दिले आहेत. आचारसंहिता असतांना सुध्दा दिव्यांगाचा निधीचे वाटप करण्यात काहीच हरकत नाही. याबाबत लाभार्थ्यानी माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन अरोरा यांनी केले.- निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारीअधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोटअपंगांचा निधी वाटप करणे हा ग्रामपंचायत अखत्यारीतील विषय आहे, याबाबत ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीने याबाबत कुठलीही विचारणा केलेली नाही. तर आता आचारसंहितेमुळे वैयक्तिक लाभाच्या कामाला मंजुरी देता येत नाही. यातच जुन्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार वाटप करण्यास काही हरकत नाही.- गजानन सुरडकर, बीडीओ, घनसावंगी

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना