शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडून केवळ दीड तासात दोन गावांच्या नुकसानीची पाहणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 00:29 IST

केंद्रीय पथकाने रविवारी तालुक्यातील पळसखेडा ठोंबरी, चांदई एक्को भागातील नुकसानीची दीड तासात पाहणी करून जाफराबाद तालुक्याचा मार्ग धरला.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन / राजूर : परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कुटुंबावर कोसळलेल्या व्यथा केंद्रीय पथकासमोर मांडताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. केंद्रीय पथकाने रविवारी तालुक्यातील पळसखेडा ठोंबरी, चांदई एक्को भागातील नुकसानीची दीड तासात पाहणी करून जाफराबाद तालुक्याचा मार्ग धरला.पथक प्रमुख तथा अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरूपगल, डॉ. के. मनोहरण, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे व इतर अधिकाऱ्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. चांदई एक्को येथील श्रीराम ढाकणे या ८८ वर्षाच्या शेतक-याच्या शेतातील मका व सोयाबीन या पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. आपल्या आयुष्यात अशी नैसर्गिक आपत्ती आली नव्हती. इतके नुकसान झाले नव्हते हे सांगताना ढाकणे यांचे डोळे पाणावले होते. ग्रामसेवक, कृषी विभागाच्या पथकाने पाहणी केली. मात्र, मदत मिळाली नाही. तुम्ही आले आणि चालले मदत केव्हा मिळणार? अशी विचारणा ढाकणे यांनी केली. मात्र, त्यांचे म्हणणे लिहून घेत अधिकारी पुढच्या दौ-याकडे गेले.पळसखेडा ठोंबरी येथील शिवाजी गायकवाड यांच्या शेतातील मकाच्या नुकसानीची पथकाने पाहणी केली. त्यानंतर राजूर येथे अनिल भालेराव यांच्या मका खरेदी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. आणि त्यानंतर हे पथक जाफराबादकडे रवाना झाले.तालुक्यातील भोकरदन, वाकडी, आन्वा, जळगाव सपकाळ, पाारध, वालसावंगी, धावडा, पिंपळगाव रेणुकाई या भागात प्रारंभीपासूनच अतिवृष्टी झाली होती. परतीच्या पावसानेसुध्दा या भागातील पिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र, केंद्रीय पथकाने या भागाची पाहणी केली नाही.किती वेळा पाहणी करणारनुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाला शेतक-यांनी आता किती वेळा पाहणी व पंचनामे करता आम्हाला रबीच्या हंगामासाठी मदत मिळेल एवढेच काम लवकर करा, असे सांगितले. मात्र शेतक-यांची भाषा या पथकातील अधिका-यांना समजत नव्हती, एवढे मात्र खरे!

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी