शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

८० पर्यवेक्षिकांना ‘कॅस’चे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:42 IST

अंगणवाडी सेविकांना मोबाईल देऊन त्यांच्या कामाशी संबधित सर्व नोंदी अ‍ॅपद्वारे घेण्याच्या प्रक्रियेला जूनपासून सुरूवात होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘कॉमन अप्लीकेशन सॉप्टवेअर’ या विषयी पर्यवेक्षिकांना ८ ते ११ मे दरम्यान प्रशिक्षण देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अंगणवाडी सेविकांना मोबाईल देऊन त्यांच्या कामाशी संबधित सर्व नोंदी अ‍ॅपद्वारे घेण्याच्या प्रक्रियेला जूनपासून सुरूवात होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘कॉमन अप्लीकेशन सॉप्टवेअर’ या विषयी पर्यवेक्षिकांना ८ ते ११ मे दरम्यान प्रशिक्षण देण्यात आले. ८० पर्यवेक्षिका व १४ ब्लॉक कॉडिनेटरांनी हे प्रशिक्षण घेतले असून, १ हजार ५४६ कार्यकर्तींना मोबाईलचे वितरण करण्यात आले आहे.शनिवारी या प्रक्षिणाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयाचे पोषण महा अभियानाचे समन्वयक एस. एल.हरदास, जागतिक बँकेचे प्रतिनिधी रमेश बाबू, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी खरात, जिल्हा समन्वयक भारती निर्मल यांची उपस्थिती होती.अंगणवाडीतील बालकांच्या दैनंदिन नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक नोंदी, पोषण आहाराचे वाटप आदी कामे अंगणवाडी सेविका करतात. या कामांच्या नोंदी विविध ११ रजिस्टरमध्ये कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा नोंद करण्यास उशीर होतो.जिल्हास्तरावरील कार्यालयाला अहवालही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने अंगणवाडी सेविकांना मोबाईल देऊन, अँपद्वारे नोंदी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १५४६ अंगणवाड्यांना मोबाइल मिळणार आहे. याबाबत बुधवारपासूनप्रशिक्षणास घेण्यात येत होते. जिल्हास्तरावर ८० पर्यवेक्षिका व निवडक कार्यकर्तींना हे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हास्तरावरीलप्रशिक्षणानंतर तालुकानिहाय अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, कॅस प्रोग्रम हा ग्राम पातळीवर चांगल्या प्रकारे राबवाव. तसेच अंगणवाडी सेविकांनी व्यवस्थित नोंदी घेऊन कामाचे नियोजन करावे, असे हरदास यांनी सांगितले.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र