शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:42 IST

जालना लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (२३ एप्रिल) मतदान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी (२३ एप्रिल) मतदान होत आहे. या निमित्त राजकीय वातावरण बरेच तापले होते. परंतु प्रचाराच्या तोफा रविवारी सायं. ६ वाजता शांत झाल्या आहेत. असे असले तरी उमेदवार मात्र, प्रत्यक्ष गाठी-भेटीवर भर देऊन वैयक्तिक पातळीवर मतदान करण्याचे आवाहन करतानाचे दिसून आले.जालना लोकसभा मतदार संघामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची राळ उठली होती. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले. अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा आणि कॉर्नर बैठका झाल्या. सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणावर यंदाची निवडणूक गाजली. एकूण २० उमेदवार असून, नोंदणीकृत पक्षाचे ९ तर ११ अपक्षांचा समावेश आहे.मतदान वेळ सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंतजालन्यात २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रारंभी सकाळी ६ वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्यात येणार आहे. सकाळी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार असून, ६ वाजेपर्यंत जे रांगेत असतील त्यांना टोकन देण्यात यईल.मतदान कर्मचारी आज रवाना होणारलोकमत न्यूज नेटवर्कजालना : २३ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व आवश्यक ते साहित्य घेऊन मतदान कर्मचारी त्या त्या मतदान केंद्रांवर सोमवारी सकाळपासून रवाना होणार आहेत.या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी रविवारी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, लोकसभा मतदार संघात जवळपास १८ लाख पेक्षा अधिक मतदार असून, सुरळीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपंग, अंध व्यक्तींसाठीही विशेष व्यवस्था केली असून, जवळपास १५० पेक्षा अधिक मतदान केंद्रांचे वेब कास्टींग करण्यात येणार आहे. इव्हीएम अथवा अन्य मशीन बंद पडल्यास ते तातडीने बदलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच आता शांततेत मतदान होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाVotingमतदान