भारज बु. : जाफराबाद तालुक्यातील भारज बु. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या जनावरांवर हल्ला करीत आहे. शुक्रवारी बिबट्याने पुन्हा एका वासराचा फडशा पडल्याची घटना समोर आली. भारज बु. परिसरातील वानखेड येथील शेतकरी सुधारक आमले यांच्या शेतात बांधलेल्या वासराचा शुक्रवारी बिबट्याने फडशा पाडला. १५ दिवसातील ही चौथी घटना असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. वनविभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बिबट्याने पाडला वासराचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:10 IST