शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गावरान पानाच्या विड्याला 'कलकत्ता'चा ब्रेक ! पानमळे आली निम्म्यावर

By विजय मुंडे  | Updated: August 22, 2023 19:09 IST

कामासाठी मजूर मिळेनात, उन्हाळ्यात पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांनी गावरान पानमळे जगवणे अवघड झाले आहे

जालना : घरगुती कार्यक्रम कोणताही असो त्यात पानाचा विडा नाही असे होत नाही! धार्मिक कार्यक्रमांमध्येही गावरान पानांचे महत्त्व अधिक आहे. परंतु, बदलत्या काळानुरूप युवा वर्गाचा कलकत्ता, बनारसी पानाकडे वाढला आहे. यामुळे दहा वर्षांतच गावरान पानांची असलेली मागणी निम्म्यावर आली असून, याचा परिणाम पानमळे मोडीत निघण्यावर झाला आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद तालुक्यांतील भारज, वालसावंगी, वालसा या गावांसह इतर ठिकाणी आठ-दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पानमळे होते. धार्मिक कार्यक्रमात पूजेसाठी गावरान पानाचे महत्त्व आहे. त्यात घरगुती किंवा इतर कार्यक्रम असाेत जेवणानंतर पानाचा विडा आवर्जून एकमेकांना दिला जात होता. शिवाय पान खाण्याने शरीराला लाभ होत असल्याचे आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात. परंतु, बदलत्या काळानुरूप कलकत्ता भागातून आलेले कलकत्ता पान आणि बनारस भागातून येणारे बनारस पान यामुळे युवा पिढीचा ओढा या पानांकडे वाढला आहे. गावरान पानांना बाजारात असणारी मागणी घटली आहे. दुसरीकडे पानमळ्यांसाठी मुबलक पाण्याची उपलब्धताही होत नाही. याचा परिणामही पानमळ्यांवर झाला आहे. पानमळ्यातील वेली लावण्याचे आणि पाने तोडण्याचे कामही जिकिरीचे आहे. हे काम करण्यासाठी मजुरांची उपलब्धता ग्रामीण भागात होत नाही. या सर्व बाबींचा परिणाम गावरान पानमळे कमी होण्यावर झाला आहे.

अनेकांनी पानमळे मोडलेआमच्याकडे गत १५ वर्षांपासून पानमळा आहे. एकेकाळी पानांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. चिखली, खामगाव, संभाजीनगर, श्रीरामपूर आदी ठिकाणी २५०० पानांचा पिटारा पाठविला जात होता. परंतु, गावरान पानांची मागणी घटली आहे. त्यात पाणी आणि मजुरांची टंचाईही आहे. यामुळे अनेकांनी पानमळे मोडीत काढले आहेत.- वसंतराव बोडखे, शेतकरी, भारज (बु.)

५०० पनांची मागणी शंभरावरआमच्या चार पिढ्यांपासून पान तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. दहा वर्षांपूर्वी आम्हाला दैनंदिन ५०० गावरान पान लागत होते. परंतु, आता कलकत्ता, बनारस पानांना ग्राहकांची मागणी वाढली आहे. त्यामुळे दिवसाला केवळ १०० गावरान पाने लागतात.- राजेश कोंड्याल, व्यापारी, जालना

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना