शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन येथील व्यापारी संकुलामुळे बाजारपेठेस मोठी चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:05 IST

भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती २ कोटी ८६ लक्ष रुपये स्वनिधीतून साकारत असलेल्या ३४ गाळ्यांच्या व्यापारी संकुलामुळे शहरातील बाजारपेठ वाढीसाठी मदत होणार आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समिती २ कोटी ८६ लक्ष रुपये स्वनिधीतून साकारत असलेल्या ३४ गाळ्यांच्या व्यापारी संकुलामुळे शहरातील बाजारपेठ वाढीसाठी मदत होणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.शहरातील म्हाडा रोडवरील गाळे बांधकामाचा रविवारी भूमिपूजन समारंभ झाला. या प्रसंगी खा. दानवे बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले. खा. दानवे म्हणाले, नवीन व्यापारी संकुलामुळे बाजार समितीच्या आवारात व्यापारी व व्यवसायिकांची संख्या वाढून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी स्थानिक व्यापा-यांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतक-यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळून शेतक-याच्या पदरात जास्तीचे चार पैसे पडणार आहेत. त्यामुळे नवीन व्यापारी संकूल हे शेतकरी व व्यापा-यांच्या उन्नती व विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास खा. दानवे यांनी व्यक्त केला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख, रामेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन विजयसिंह परिहार, विनोद गावंडे, जि. प. सदस्या आशा पांडे, मुकेश चिने, सुखलाल बोडखे, जाफराबाद बाजार सिमतीचे सभापती भाऊसाहेब जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेश चव्हाण, बाजार समितीचे सभापती कौतीकराव जगताप, उपसभापती रामलाल चव्हाण, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गणेश ठाले, जि. प. सदस्य संतोष लोखंडे, जि. प. सदस्य विठ्ठल चिंचपुरे, दीपक जाधव, भाजपा शहराध्यक्ष सतिश रोकडे, सुधीर पाटील, दीपक वाकडे, भगवान खाकरे, विजय कड आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास बाजार समितीचे सचिव दादाराव दळवी, संचालक अ‍ॅड. विश्वास सपकाळ, बालाजी औटी, समाधान शेरकर, इम्रानखा पठाण, विश्वनाथ जाधव, सांडू वाघ, गुलाबराव मगरे, प्रल्हाद शिंदे, गणेश देशमुख, बाबुप्रसाद शर्मा, सुरेश तळेकर, पुरूषोत्तम राठी, कैलास पुंगळे, सुभाष गावंडे, विजय इंगळे, कल्याण शेळके यांच्यासह लेखापाल संतोष ढाले, सहायक सचिव हरीभाऊ जंजाळ, अनिल रोकडे, भाऊराव तळेकर, योगेष बिरसोने, हरी पवार, रामकृष्ण गाढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMarket Yardमार्केट यार्ड