शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कामांमुळे इमारती अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:13 IST

येथील शासकीय रुग्णालय परिसरात बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय व जीएनएम डिप्लोमाच्या इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झाले आहे; परंतु अद्यापही इमारतीचे अर्धवट काम राहिले आहेत.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील शासकीय रुग्णालय परिसरात बी.एस्सी. नर्सिंगमहाविद्यालय व जीएनएम डिप्लोमाच्या इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झाले आहे; परंतु अद्यापही इमारतीचे अर्धवट काम राहिले आहेत. दरम्यान, या नव्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडून चोरटे इमारतीमधील साहित्य लंपास करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.मराठवाड्यात बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरु करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्याचबरोबर जालना येथील जीएनएम डिप्लोमाला नवीन इमारत निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली होती. २००८ व २००९ साली तत्कालनी शिक्षणमंत्र्यांनी या दोन्ही मागण्यांची दखल घेत याला मजूंरी दिली.त्यानंतर २०१५ साली जालना शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने या दोन्ही इमारतीचे काम करण्यात आले. बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीसाठी शासनाने ५१० कोटी रुपये खर्च केले तर जीएनएमच्या इमारतीसाठी ७ कोटी ८६ लाख रुपये खर्च करुन सुज्ज अशा या इमारती तयार करुन शहराच्या वैभवात भर घातली. परंतु, मागील तीन ते चार वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.इमारतीमधील हॉलचे काम अपुर्णच आहे. तसेच ड्रेनेजची कामे यासह आदी कामे अर्धवट सोडली आहे. सध्या इमारतीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, खिडक्यांची काचे फोडून चोरटे इमारती मधील साहित्य चोरुन नेत आहे.या दोन्ही इमारतीच्या जवळपास सर्वच खिडक्यांची काचे फोडण्यात आली असून, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून, सरकारच्या कोट्यांवधी रुपयांचा चुरडा होत आहे.मोडकळीस आलेल्याइमारतीत बसतात विद्यार्थीजीएनएमचे विद्यार्थी जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीत शिक्षण घेतात. तसेच येथे मुलींचे वृस्तीगृह ही आहे.या सर्व विद्यार्थ्यांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याकडे जिल्हा रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.भाड्याचा विनाकारण खर्च : बी.एस्सी.साठी मोजावे लागतात लाखो रुपयेबी.एस्सी.चे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगी महाविद्यालयात लाखो रुपये खर्च येतो. त्यामुळे राज्य सरकारतर्फे राज्यात मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर या ठिकाणी शासकीय महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. जालना जिल्हा व परिसरातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात बी.एस्सी. करता यावे, यासाठी जालना येथे हे महाविद्यालय स्थापन करण्यात आले; परंतु इमारतीच्या अर्धवट कामाअभावी महाविद्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.तळीरामाचे अड्डेया दोन्ही इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. खिडक्यांच्या काचा फोडून दारुडे आता प्रवेश करून साहित्याची तोडफोड करतात. इमारतीत असलेली लाईट व वायरिंग यासह इतर साहित्य लंपास केल्याचे दिसून आले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcollegeमहाविद्यालयpwdसार्वजनिक बांधकाम विभाग