शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प म्हणजे पाकात बुडवलेले गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:11 IST

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सादर केलेले बजेट फसवे असून, तरतूद नसताना अनेक घोषणा यात करण्यात आलेल्या आहे. हा प्रकार म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

जालना : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सादर केलेले बजेट फसवे असून, तरतूद नसताना अनेक घोषणा यात करण्यात आलेल्या आहे. हा प्रकार म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.खा. शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना असून, आगामी काळात यावर संघटनेतर्फे राजकारण केले जाईल. या सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहे. आर्थिक वर्षाचे बजेट मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आरोग्य विमा, कृषी विभागासाठी भरीव तरतूद केल्याचे सांगितले. स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रांनुसार दीडपट हमीभाव देण्याचे म्हटले असले तरी ए-२ आणि सी-२ मधील तरतुदींचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ शेतक-यांना कितपत होईल, याबाबत सांशकता आहे. बजेटमध्ये संशोधनासाठी कुठलीही तरतूद नाही. मराठवाड्यात १०० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीने सरकारकडून कुठल्याही उपाययोजना होताना दिसून येत नाही. कर्जमाफीची योजना जाहीर करुन सहा महिने झाले आहेत. त्यानंतर याचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याचा एकही शेतकरी आपल्याला भेटला नसल्याचे ते म्हणाले. शेतक-यांचा सातबारा कोरा करण्यासह विविध प्रश्नांवर येत्या काळात संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याचे खा. शेट्टी म्हणाले. पत्रकार परिषदेस वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोकळे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे, गोविंदप्रसाद मुंदडा, सुरेश गवळी आदी उपस्थित होते....................................छोटे राज्य विकासाचे मॉडेल...स्वतंत्र विदर्भ राज्यास संघटनेचा पाठिंबा असून, छोटे राज्य हे विकासाचे मॉडेल होऊ शकतात. तेलंगणा, पंजाब, हरियाणा इ. राज्ये याची उत्तम उदाहरणे आहेत. म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्यास संघटनेचा पाठिंबा असल्याचे खा.शेट्टी यांनी सांगितले..................................तूर विकण्याची घाई नको..डाळवर्गीय पिकांचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शेतक-यांनी सध्या तूर व इतर डाळी विकण्यास घाई करु नये. बाजार हा पुरवठा आणि मागणी यावर चालत असतो. भाव वाढल्यानंतर शेतक-यांना आपला माल विकावा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले.................................