शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलचे २ कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:50 IST

रस्त्यांची कामे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामुळे १५०० लॅण्डलाईन बंद पडल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील रस्त्यांची कामे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामुळे १५०० लॅण्डलाईन बंद पडल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत नगरपालिकेला ८० लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, नगरपालिकेने अद्यापही नुकसान भरपाई दिली नाही.जालना शहरातील सर्वच रस्ते नव्याने तयार करण्यात आले. यात कचेरी रोड, बसस्थानक रोड, बडी सडक, शिवाजी पुतळा, भोकरदन नाका यासह आदी रस्ते तयार करण्यात आले. तर काही रस्त्यांची कामे सुरु आहेत.हे रस्ते तयार करतांना खोल पर्यंत खोदावे लागत असल्याने १ मीटर खोलवर असलेल्या टेलीकॉम कंपन्याचे वायर तोडतात. याचा फटका टेलिकॉम कंपन्या बसत आहे. तसेच शहरातील नळ जोडणी, पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी खोदण्यात येणा-या खड्ड्यांमुळे बीएसएनएल या कंपनीला कोट्यांवधींचा फटका बसला आहे. यामुळे मागील दीड वर्षात १५००० लॅण्डलाईन बंद पडले असून, कंपनीला २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.यामुळे शहरतील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला.जालना शहरात सर्वच रस्त्यांची कामे झाले आहे. तसेच अनेकवेळा पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्ते खोदण्यात येते. यामुळे टेलीकॉम कंपन्यांची वायर तुटल्या जातात. दरम्यान, नगरपालिकेच्या हद्दी झालेल्या कामांची नुकसान भरपाई नगरपालिकेने देणे बंधनकारक आहे. यासाठी नगरपालिकेकडे ८० लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु, नगरपालिकेने अद्यापही नुकसान भरपाई दिली नसल्याचे बीएसएनएलच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJalana Muncipalityजालना नगरपरिषद