शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

मंठ्यात भावानेच केला भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:28 AM

फोटो मयत अमोल रणभवरे मंठा (जि. जालना) : मारहाण केल्याचा राग मनात धरून चुलत भावाने काठीने मारहाण करून ...

फोटो मयत अमोल रणभवरे

मंठा (जि. जालना) : मारहाण केल्याचा राग मनात धरून चुलत भावाने काठीने मारहाण करून भावाचा खून केल्याची घटना मंठा शहरातील शासकीय गोदामाजवळ रविवारी सकाळी उघडकीस आली. अमोल मारोती रणभवरे (वय २२, रा. मंठा) असे मयताचे नाव आहे.

अमोल रणभवरे हा औरंगाबाद येथे मावशीकडे राहतो. शनिवारी तो मंठा येथे चुलते अंबादास रणभवरे यांच्याकडे आला होता. अमोलने सायंकाळी दारू पिऊन चुलत्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे न दिल्याने वाद घालून तो निघून गेला. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अमोल आणि त्याचा चुलत भाऊ सचिन रणभवरे यांची मंठा फाट्यावरील शासकीय गोदामाजवळ भेट झाली. अमोलने सचिनकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने अमोलने सचिनला मारहाण केली. त्यानंतर सचिन हा घरी निघून गेला. मारहाण झाल्याचा राग मनात धरून सचिन पुन्हा मंठा फाट्यावर गेला. त्याने अमोलला झाडाची फांदी तोडून मारहाण केली. यात अमोल गंभीर जखमी झाला. त्यानंतर सचिन घरी निघून गेला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सचिन पुन्हा शासकीय गोदामाजवळ आला. त्याला अमोल मृत अवस्थेत दिसला. त्याने याची माहिती चुलते अंबादास रणभवरे यांना दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास निकम, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार, ए.जे. शिंदे, पोलीस कॉ. श्याम गायके, केशव चव्हाण, देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अंबादास बाबूराव रणभवरे यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी अटकेत

माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी इंदलकर बहुरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संशयित आरोपी सचिन बबन रणभवरे (२३, रा. मंठा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास निकम करीत आहेत.