जितेंद्र अग्रवाल यांचा सत्कार
जालना : जुना जालना येथील जागृत अमृतेश्वर महादेव मंदिरास जितेंद्र मदनलाल अग्रवाल यांनी सोमवारी दिवापेटी भेट दिली. यावेळी जितेंद्र अग्रवाल यांचा गणेश सुपारकर यांनी सत्कार केला. याप्रसंगी गणेश सुपारकर, माजी नगरसेवक राम सतकर, राहुल सुपारकर, गणेश हेलगट, संतोष सुपारकर, आनंद ओम अग्रवाल, राजू खुदभैय्ये, राकेश प्रदीप धारीवाल, नवीन राठौर आदींची उपस्थिती होती.
फोेटो
शुभम विसपुते याला अटल गौरवरत्न
जालना : अटल भारत क्रीडा एंव कला संघाच्या वतीने भोपाळ येथे नाशिकच्या संगीत, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय अटल गौरवरत्न पुरस्कारने गौरविण्यात आले. यात जालना येथील शुभम विसपुते याचाही अटल गौरवरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी अजित जोशी, भूषण मोहकर, शिवाजी हांडे, लक्ष्मी डोखळे, रोहित बनसोडे, रूद्र पोरीया, तनिष्क गजभिये, कमलेश शिंदे, सायली पेशवे आदींची उपस्थिती होती.