शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

मुन्नाभार्इंकडून जिवाशी खेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:49 IST

अनेक मुन्नाभाईं नियमांना डावलून प्रॅक्टिस करत असल्याचे उघडकीस आले, असे असतांनाही जिल्ह्यात ७६ बोगस डॉक्टरांपैकी केवळ १० डॉक्टरांवरच कारवाई करण्यात आली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समाजात डॉक्टरी पेशाला दैवत मानले जाते. परंतु पैशाच्या लोभापोटी काही लोक चुकीच्या पद्धतीने तसेच नियमांना डावलून लोकांच्या जिवाशी खेळत असल्याचे वास्तव आहे. आरोग्य विभागाच्यावतीने विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील रूग्णालयांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये अनेक मुन्नाभाईं नियमांना डावलून प्रॅक्टिस करत असल्याचे उघडकीस आले, असे असतांनाही जिल्ह्यात ७६ बोगस डॉक्टरांपैकी केवळ १० डॉक्टरांवरच कारवाई करण्यात आली आहे. उवर्रित ६६ मुन्नाभाई रूग्णांच्या जीवाशी अद्यापही खेळत आहेत.वैध पदवी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणे, पदवी एका पॅथीची, तर प्रॅक्टिस दुसऱ्या पॅथीची, तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशन अ‍ॅक्टनुसार नोंदणी न करता प्रॅक्टिस करणा-या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे समोर आले आहे. कंपाउंडर म्हणून काम केल्याच्या अनुभवाचा गैरफायदा घेत जिल्हयात अनेक बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बोगसगिरी टाळण्यासाठी असलेली सरकारी समिती अकार्यक्षम असल्याने हे डॉक्टर वाढतच आहेत. ग्रामीण भागात ही संख्या जास्त आहे. कमी पैशात उपचार होतात म्हणून या डॉक्टरांकडे गर्दी होतेया गावांमध्ये मुन्नाभार्इंचा वावर..परतूर तालुक्यातील येणोरा, पाटोदा, माव, धामणगाव, संकनपुरी, लांडक, दरा, चांगतपुरी, वलखेड, अकोली. मंठा तालुक्यातील नायगाव. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी बसस्टॅड. जाफराबाद तालुक्यातील माहोरा, देळेगव्हाण, केदारखेडा, शिपोरा बाजार, गोलापांगरी.बदनापूर तालुक्यातील बदनापूर, निकळक, वाल्हा, गेवराई बाजार, ढासला, सोमठाणा, सायगाव, नागेगाव, कुसळी, बाजार वाहेगाव, बुटेगाव, काजळा, केळीगव्हाण, हिवर, उज्जेनपुरी, आन्वी, डावरगाव, कंडारी बु, बावणे पांगरी, भाकरवाडी, कंडारी, तुपेवाडी.अंबड तालुक्यातील शेवगा (पा), चिंचखेड, पिंपरखेड, लोणार भायगाव, माहेर भायगाव, देवगव्हाण, भ. जळगाव, टाका, सोनक पिंपळगाव, कोळी सिरसगाव, दहिपुरी, रोहिलागड, कर्जत, धाकलगाव, वाळकेश्वर, साष्ट पिंपळगाव, किनगाव चौफुली, आलमगाव, नागझरी, शहागड, म. चिंचोली, राजा टाकळी आदी ठिकाणी बोगस डॉक्टर असल्याचा अहवाल आहे.दहा डॉक्टरांवर कारवाईजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने १० डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात एस. भांदुर्गे (घनसावंगी) डॉ. ज्ञानेश्वर मोरे (गोलापांगरी), डॉ. उत्तम रोहिदास मुजूमदार (गोलापांगरी), डॉ. विश्वास सरकार (गेवराई बाजार), डॉ. लतिफ पठाण (डावरगाव), डॉ. संशात बाऊल (कंडारी बु.), डॉ. रमेश रूस्तुमराव जायभाये (कंडारी), डॉ. गणेश त्र्यंबक आवचार (नानेगाव), अमोल जगदीश जागृत (म. चिंचोली), युवराज गुलाब डेगंळे (रा. टाकळी) यांच्यावर कारवाई केल्याची माहिती डीएचओ विवेक खतगावकर यांनी दिली.महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची परवानगी आवश्यकचपरराज्यात वैद्यकीय पदवी घेतली असली तरी महाराष्ट्रात प्रॅक्टिस करायची असेल तर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करणे आणि प्रॅक्टिस करण्यासाठी कौन्सिल व इंडियन मेडिकल असोसिएशनची परवानगी बंधनकारक आहे. परंतु, वाड्या- पाड्यांवर प्रॅक्टिस करणारे बंगाली डॉक्टरांकडे अशी कोणतीही परवानगी नाही.बोगस बंगाली डॉक्टरशासकीय आरोग्याची सेवा तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस डॉक्टरांकडून घेतला जाता आहे. ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांचे उपचार गरिबांच्या जीवावरच बेतण्यासारखे आहेत. तर दुसरीकडे ढिम्म जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कठोर कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीयHealthआरोग्य