जालना : बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. यामुळे आता बोगस लाभार्थ्यांची खैर नाही.
निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निराधार व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरवशावर जगत असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या पैशाचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येतो, परंतु काही जण बोगस कागदपत्र सादर करून या योजनाचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यानंतर, आता सर्वच लाभार्थ्यांची तहसील कार्यालयामार्फत तपासणी केली जात आहे. यातून बोगस लाभार्थांचा शोध घेतला जात आहे.
शासनाने निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, तहसील कार्यालयांना आदेश दिले असून, बोगस लाभार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल वाचले.
राजू शिंदे, तहसीलदार