शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरसारखे मोती तलावात बोटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:14 IST

वेण्णा लेक (महाबळेश्वर) च्या धर्तीवर शहरातील मोती तलावात लवकरच बोटिंग सुरु करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले.

जालना : वेण्णा लेक (महाबळेश्वर) च्या धर्तीवर शहरातील मोती तलावात लवकरच बोटिंग सुरु करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी सांगितले. सोमवारी मोती तलावात बोटिंगचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यावेळी नगराध्याक्षा बोलत होत्या.यावेळी माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, एकबाल पाशा, बबलू चौधरी, जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, शिक्षण व आरोग्य सभापती रघुनाथ तौर, न. प. भाजपा गट नेते अशोक पांगारकर, रामधन कळंबे, सभापती महावीर ढक्का, नगरसेवक शाह आलम खान, जयंत भोसले, विष्णू वाघमारे, राहुल हिवराळे, राधाकिसन दाभाडे, इसाखान पठाण, कृष्णा पडूळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.गोरंट्याल म्हणाल्या की, वाढत्या धावपळीतून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी शहरातील बहुतांशी कुटुंब आणि बच्चे कंपनी छत्रपती संभाजी उद्यानात येतात. उद्यानाला लागून असलेल्या तलावात बोटींग सुरु करण्याचा मानस होता. त्यासाठी पुणे येथील पिरॅमिड इंजिनिअरिंग कंपनीशी संपर्क साधून बोलणी करण्यात आली असून सोमवारी प्रायोगिक तत्त्वावर हे प्रात्यक्षिक करण्यात आले. लवकरच आणखी दोन बोटी मागवण्यात येणार आहेत. या प्रयत्नाला जालनेकरांकडून प्रतिसाद मिळाला तर आणखी सहा बोट कंपनीकडून मागवण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आ. गोरंट्याल म्हणाले की, अटल अमृत उद्यान योजनेअंतर्गत मोती तलावाच्या पाठीमागे असलेल्या २५ एकर जागेत नागरी उद्यान उभारण्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्याचे काम सुरु झाले आहे. या उद्यानात सायकल ट्रॅकसह बोटिंगची व्यवस्थाही राहणार असल्यामुळे या उद्यानामुळे शहराच्या वैभवात भर पडेल. कंपनीचे अभियंता सागर गलांडे यांनी सांगितले, की या बोटीची वजन क्षमता पाचशे ते सहाशे किलो इतकी असून सहा प्रवासी बसू शकतात. फायबर ग्लास रेनफोर्सच्या माध्यमातून ही बोट तयार करण्यात आलेली असल्यामुळे ही बोट पाण्यात बुडत नाही. बोटमध्ये बसणा-या व्यक्तींना सुरक्षा जॅकेट पुरविले जाणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री आ. राजेश टोपे, माजी आ. कैलास गोरंट्याल, बबलू चौधरी आदींनी बोटीतून फेरफटका मारला.